कोकणवासीयांचा 'शिमगा' गोड

मुंबई-विजयदुर्ग जलप्रवासाचा १ मार्चपासून श्रीगणेशा; मंत्री नितेश राणे यांचे स्वप्न साकार


मुंबई : कोकणच्या लाल माती ओढ असलेल्या चाकरमान्यांसाठी यंदाचा शिमगोत्सव विशेष ठरणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेली मुंबई ते विजयदुर्ग ही जलवाहतूक सेवा १ मार्चपासून अधिकृतपणे सुरू होत आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू करण्यात येत असून, यामुळे मुंबई-कोकण प्रवासाचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे.


एकेकाळी मुंबई ते कोकण अशी सुरू असलेली जलवाहतूक एका अपघातानंतर बंद झाली होती. ही सेवा पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती. नितेश राणे यांनी बंदर विकास खात्याची सूत्रे हाती घेतल्यापासून या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. त्यांच्या मेहनतीला आता यश आले आहे. 'एम२एम' कंपनीच्या माध्यमातून ही 'रो-रो' फेरी सेवा चालवली जाणार असून, यामुळे सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.

७ तासांत विजयदुर्ग गाठणे शक्य


रस्ते वाहतुकीतील कोंडी आणि रेल्वे आरक्षणाची अडचण लक्षात घेता, ही जलवाहतूक सेवा कोकणवासीयांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या सेवेसाठी 'एम२एम प्रिन्सेस' हे आधुनिक जहाज चालवले जाणार असून, एका फेरीमध्ये ६२० प्रवासी आणि ३५ वाहने नेण्याची त्याची क्षमता आहे. या जहाजामुळे अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्गला पोहोचता येईल.

वेळापत्रक आणि नियोजन


या सेवेची उद्घाटन फेरी १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मुंबईतील 'फेरी व्हार्फ' (भाऊचा धक्का) येथून मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत निघणार आहे.


मुंबईहून प्रस्थान : दर बुधवारी व शनिवारी सकाळी ८.०० वाजता.
विजयदुर्गहून प्रस्थान : दर गुरुवारी व रविवारी दुपारी १२.०० वाजता.


तिकीट दर असे
- इकॉनॉमी - ३,०००
- प्रीमियम इकॉनॉमी - ५,०००
- बिझनेस - ७,०००
- फर्स्ट क्लास - ९,०००


वाहनांसाठी शुल्क
- दुचाकी : १,०००
- सायकल : ६००


पर्यटनाला मिळणार चालना


"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलवाहतूक प्रोत्साहन धोरणांतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे कोकणातील पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक संपर्काला मोठी गती मिळेल," असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे. या फेरीसाठी तिकीट विक्री सुरू झाली असून, इच्छुकांना www.m2mferries.com, https://www.m2mferries.com या संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करता येईल.


Comments
Add Comment

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास

Buldhana Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकची समोरील वाहनाला धडक; चालकाचा जागीच मृत्यू, क्लिनर जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरुच असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास आणखी एक भीषण अपघाताची