सैनिक शाळेत शिकण्याची सुवर्णसंधी

पुणे : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून, उत्तराखंड येथील इयत्ता आठवीच्या प्रवेशासाठी पात्रता परीक्षा सात जून २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी मुले आणि मुली दोघेही अर्ज करू शकतात, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.


या परीक्षेसाठी उमेदवार एक जानेवारी २०२७ रोजी इयत्ता सातवीमध्ये शिकत असावा किंवा सातवी उत्तीर्ण असावा. यासाठी वयोमर्यादा ११ वर्षे सहा महिने ते १३ वर्षे अशी असून जन्मदिनांक दोन जानेवारी २०१४ ते एक जुलै २०१५ दरम्यान असावी. या परीक्षेसाठीचे अर्ज ऑनलाईन किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे मागविता येणार असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी शुल्क ६०० रुपये आणि अनुसूचित जाती/ जमातीसाठी ५५५ रुपये आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे.


पूर्ण भरलेले अर्ज पाच एप्रिल 2026 पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, शिवाजीनगर, पुणे येथे स्पीड पोस्टाने किंवा समक्ष जमा करावेत. अर्ज थेट डेहराडून येथे पाठवू नयेत. अधिक माहितीसाठी परीक्षा परिषदेच्या mscepune.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त महेश चोथे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि