नांदेड : रुग्णालयात उपचारासाठी जात असतानाच नांदेडच्या (Nanded) गाढे बाप-लेकावर काळाने घाला घातला. नांदेड-नागपूर राष्ट्रीय मार्गावरून जाणाऱ्या त्यांच्या दुचाकीला समोरुन येत असलेल्या भरधाव आयसर ट्रकने जोरदार धडक दिली आणि अपघात झाला. या अपघातात दोघांनाही प्राण गमवावे लागले आहेत. आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस (Nanded Police) करत आहेत.
अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील दाजीबा शंकरराव गाढे (वय ६५ वर्षे) यांचा मोठा मुलगा गोपीनाथ दाजीबा गाढे (वय ४० वर्षे) हे आपल्या वडिलांना वैद्यकीय तपासणीसाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात घेऊन जात होते. दरम्यान, असना पुलावर नांदेड-अर्धापूर मार्गे भरधाव जाणाऱ्या आयसरने (ट्रक क्रमांक एम.एच.४५ ए.ई-८८११) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर येत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात दाजीबा गाढे हे असना पुलावरून ४५ ते ५० फूट उंचीवरून खाली पडले, तर मुलगा गोपीनाथ गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अपघात घडल्यानंतर या महामार्गावर एकच गर्दी झाली. उपस्थितांपैकी गोविंद टेकाळे यांनी अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर अपघातस्थळाच्या हद्दीतील विमानतळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. सोबतच, नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका देखील दाखल झाली. दोन्ही जखमींना तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील दोघाही कर्त्या पितापुत्राचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याने गाढे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…