आता वंदे भारतने ३ तासांत पोहोचा काशीवरून अयोध्येला, पंतप्रधान मोदी आज दाखवणार हिरवा झेंडा

  61

वाराणसी: अयोध्येमध्ये रामलल्ला विराजमान झाल्यानंतर काशीवरून अयोध्येला जाणाऱ्या भक्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम भक्तांसाठी शिवनगरी वाराणसीला मोठे गिफ्ट दिले आहे. आता काशीवरून भक्त अवघ्या ३ तासांत अयोध्येला पोहोचू शकतात. वंदे भारतच्या रुपाने हे गिफ्ट देण्यात आले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी या रेल्वेला व्हर्च्युअली झेंडा दाखवतील. काशीाला आणखी एक वंदे भारत मिळत आहे. मंगळवारी सकाळी १२.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवतील. ही वंदे भारत पाटणा येथून वारणसी कँट रेल्वे स्टेशन व्हाया अयोध्या धाम आणि लखनऊपर्यंत धावले. यामुळे काशी येथून पर्यटकांना अयोध्येला जाणे सोपे होईल.


ही वंदे भारत पाटणा येथून सकाळी ९.३० वाजता वाराणसी कँट स्टेशनला पोहोचेल. १२.३० वाजता अयोध्येला पोहोचेल. म्हणजेच काशीवरून अयोध्येला अवघ्या तीन तासांत पोहोचता येईल.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री