Swapnil Joshi : 'नाच गं घुमा' नंतर स्वप्नील जोशी दिसणार 'बाई गं' मध्ये!

लागोपाठ दोन स्त्रीप्रधान चित्रपटांमध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका


मुंबई : एखादा चित्रपट बायकांनी डोक्यावर घेतला की तो हिटच होतो. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari deva) हा चित्रपट देखील महिलांनी डोक्यावर घेतला आणि बॉक्स ऑफिसवर (Box office) तो सुपरहिट ठरला. 'झिम्मा'च्या (Jhimma) दोन्ही भागांना तेवढीच दाद आणि लोकप्रियता मिळाली. अगदी पूर्वीपासून ही परंपरा चालत आली आहे. अलका कुबलचे चित्रपटही बायकांनीच सुपरहिट केले. त्यामुळे आता स्त्रीप्रधान विषय सिनेमांमधून मांडण्याचा दिग्दर्शकही आटोकाट प्रयत्न करत आहेत.


या पार्श्वभूमीवर आता मे महिन्यात 'नाच गं घुमा' (Nach ga ghuma) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर लगेचच जून महिन्यात 'बाई गं' (Bai ga) हा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटांमध्ये महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.


सध्या 'नाच गं घुमा' या चित्रपटाचं दणक्यात प्रोमोशन सुरु आहे. त्यातच स्वप्नील जोशीने आपल्या आगामी 'बाई गं' या सिनेमाचीही घोषणा केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहे. येत्या १४ जून २०२४ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



सिनेमाबद्दल काय म्हणाला स्वप्नील?


'बाई गं' या चित्रपटाबद्दल बोलताना स्वप्नील म्हणाला, "नाच गं घुमा नंतर लगेच बाई गं सारखा चित्रपट करण माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच या चित्रपटात मी काय करतोय हे सगळ्यांना सांगण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. २०२४ मध्ये खूप काम करतोय आणि तुमचं न थांबता मनोरंजन करता येतंय या सारखं वेगळं सुख काय असणार ना! निर्मिती सोबतच अभिनय करत २०२४ वर्षात खूप प्रोजेक्ट्स मधून काम करणार आहे आणि बाई गं नक्कीच काहीतरी खास असणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे पण लवकरच या चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी शेअर करण्यासाठी मी देखील उत्सुक आहे", असं स्वप्नील म्हणाला.

Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे