नागपूरात मांजर चावल्यामुळे ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नागपूर : महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. मांजर चावल्यानंतर एका ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. ही घटना नागपूरमधील हिंगणा तालुक्यातील उखडी गावात घडली आहे. श्रेयांशू कृष्णा पेंदाम असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवालानंतर मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. शनिवारी श्रेयांशु आपल्या मित्रासोबत खेळत होता. घराजवळ एक मांजर त्याच्या जवळ आली. मांजरी सोबत खेळता खेळता तिने त्याच्या पायाला चाव घेतला, असे त्याने आईला सांगितले. या घटनेच्या काही वेळानंतर त्याला मळमळ आणि ओकाऱ्या सुरु झाल्या. त्यामुळे त्याचे आईवडील श्रेयांशूला घेऊन हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात गेले. मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर श्रेयांशुच्या कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.


दरम्यान, मांजराने चावा घेतल्याने मृत्यू ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. मांजराने दंश केल्यानंतर इतक्या कमी वेळात मृत्यू होणे कठीण आहे. मांजराने हल्ला केल्याने तो घाबरला. त्यामुळे काही वेळात त्याला ओकाऱ्या सुरू झाल्या. त्यानंतर ओकारी बाहेर न येता घशातून श्वसन नलिकेत जाऊन श्वास रोखल्याने त्याचा मृत्यू झाला असावा. अथवा आणखी कोणत्या विषारी श्वापदाने दंश केला असू शकतो. मांजर चावल्याने इतक्या कमी वेळात मृत्यू होणे दुर्मीळ आणि अतिशय दुःखद घटना आहे. नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे आताच सांगणे कठीण आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर निश्चित कारण समोर येईल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी प्रवीण पडवे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 'सहासूत्री' कार्यक्रम; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

राज्यात १ जानेवारीपासून प्रशिक्षणाची दुसरी बॅच; १ लाख १० हजार तरुणांचे प्रशिक्षण पूर्ण नागपूर : राज्यात सुरू

तिरुवनंतपुरममध्ये एनडीएने इतिहास रचला, केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यूडीएफचा विजय

तिरुवनंतपुरम : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने शनिवारी तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये इतिहास रचला, जिथे त्यांनी