Subhash Yadav : ईडीने लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय सुभाष यादव यांना केली अटक

Share

८ तासांच्या छापेमारीनंतर जप्त केली ‘इतकी’ मालमत्ता

पाटणा : बिहारमध्ये (Bihar) ईडीने (ED) लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सुभाष यादव (Subhash Yadav) यांच्याशी संबंधित व्यवसायासंदर्भात पाटण्यातील आठ वेगवेगळ्या ठिकाणी काल छापे (Raids) टाकले होते. यातून ईडीच्या पथकाने दोन कोटी रुपये रोख आणि गुंतवणूक आणि जमिनीशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. यानंतर काल रात्री उशिरा ईडीने सुभाष यादव यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने सुभाष यादव यांना शनिवारी रात्री उशिरा पाटण्यातील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारी त्यांना पाटणा येथील बेऊर कारागृहात हलवण्याची तयारी सुरू आहे.

सुभाष यादव यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूकही आरजेडीच्या तिकिटावर लढवली होती. त्यांच्यावर पाटण्यात अवैध वाळू उत्खनन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. आयकर विभागानेही त्यांच्या जागेवर अनेकदा छापे टाकले आहेत.

माहितीनुसार, सोमवारी ईडीची टीम पाटणा येथील ईडीच्या विशेष न्यायालयात रिमांडबाबत अपील करणार असून सुभाष यादव यांना रिमांडवर घेण्याची मागणी करणार आहे. सुभाष यांना न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेण्यासाठी ईडी अपील करणार आहे. यानंतर तपास यंत्रणा सुभाष यादव यांना आपल्या ताब्यात घेईल आणि त्याच्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर त्याची सखोल चौकशी करेल. या अटकेनंतर आगामी काळात सुभाष यादव यांच्याशी संबंधित प्रकरण आणि अनेक राजकीय व्यक्तींशी असलेले त्यांचे संबंधही समोर येऊ शकतात.

Recent Posts

औट घटकेचा इंद्र ‘राजा नहूष’

विशेष - भालचंद्र ठोंबरे नहूष हा कुरूवंशातील पराक्रमी राजा होता. तो ययातीचा पिता आणि आयूचा…

3 hours ago

कवकांची अद्भुत दुनिया ! (भाग १)

निसर्गवेद - डॉ. महालक्ष्मी वानखेडकर गली खजिन्यातील एक हिरा म्हणजे ही कवक, बुरश्या, भूछत्र, अळंबी,…

3 hours ago

खून पतीचा; जेलमध्ये पत्नी

क्राइम - अ‍ॅड. रिया करंजकर प्रत्येकाला समाजामध्ये नाव कमवायचे असते. त्यामुळे लोक कुठल्याही थराला जाऊन…

4 hours ago

भेटी लागी जीवा…

हलकं-फुलकं - राजश्री वटे पहाटेची सूर्योदयाची वेळ... केशरी रंगाने अवकाश भरून गेले होते! पिवळा पितांबर…

4 hours ago

ऋषिमुनी : कविता आणि काव्यकोडी

भक्कम, विशाल आहे हा बहुगुणी ध्यानस्थ बसलेला जणू वाटे ऋषिमुनी विषारी वायू शोषून हा प्राणवायू…

4 hours ago

नवतारे

कथा - प्रा. देवबा पाटील यशश्री तू मला चहा पाजलास व मला खरोखरच तरतरी आली.…

4 hours ago