भारताने पाचवी कसोटी एक डाव आणि ६४ धावांनी जिंकली

तीन दिवसांत संपवला सामना; मालिका ४-१ ने खिशात


धर्मशाळा : पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. धर्मशाळा (Dharmashala) येथे खेळलेला हा सामना अवघ्या तीन दिवसांत संपला.


इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव ४७७ धावांवर संपला. अशा प्रकारे टीम इंडियाला २५९ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडचा दुसरा डाव १९५ धावांत आटोपला आणि भारताने एक डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवला.


आज संपूर्ण इंग्लंड संघ दुसऱ्या डावात गडगडला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका ४-१ ने जिंकली.


शंभरावी कसोटी खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी खेळली. पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला होता, पण त्यानंतर भारतीय खेळाडूंनी जबरदस्त पुनरागमन करत उर्वरित चारही सामने जिंकले.

Comments
Add Comment

French Open 2026 Novak Djokovic : नोव्हाक जोकोविच दमदार सुरुवात; २५व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने विजयी पाऊल

नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) याने फ्रेंच ओपन २०२६ स्पर्धेत विजयी सलामी देत आपल्या विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम

FIFA WORLD CUP 2026 : जर्मनीचा फिफा विश्वचषक जिंकण्याचा निर्धार

बर्लिन (वृत्तसंस्था): आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या जर्मनीसमोर आता पुन्हा एकदा

FIFA WORLD CUP 2026 : अखेरच्या सामन्यात 'माद्रिद'चा विजयी

डॅनी कार्व्हाजालला भावनिक निरोप  माद्रिद (वृत्तसंस्था) : स्पॅनिश ला लिगा फुटबॉल लीगच्या यंदाच्या हंगामाचा शेवट

IPL 2026 K. L. Rahul : ईडन मैदानावर के.एल राहुल बरसला!

कोलकाता (वृत्तसंस्था) : आयपीएल २०२६ मधील ७० व्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स

National Record Holder : भारतीय ॲथलेटिक्समध्ये नवा सूर्योदय; विशाल टी.के.ने रचला महाविक्रम

- अवघ्या ४४.९८ सेकंदांत ४०० मीटरची शर्यत फत्ते रांची (वृत्तसंस्था) : भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात

IPL 2026 : वानखेडेवर राजस्थानचा 'रॉयल' विजय

मुंबई हरली ; पंजाब - कोलकाताचेही स्वप्न तुटले : मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल २०२६ च्या अंतिम टप्प्यात वानखेडे