FIFA WORLD CUP 2026 : अखेरच्या सामन्यात 'माद्रिद'चा विजयी

डॅनी कार्व्हाजालला भावनिक निरोप 


माद्रिद (वृत्तसंस्था) :
स्पॅनिश ला लिगा फुटबॉल लीगच्या यंदाच्या हंगामाचा शेवट कमालीचा थरारक आणि नाट्यमय ठरला. अंतिम फेरीच्या सामन्यात रिअल माद्रिदने अॅथलेटिक बिलाबाओचा ४-२ असा धुव्वा उडवत हंगामाचा शेवट विजयाने केला.



रिअल माद्रिदचा दिग्गज बचावपटू डॅनी कार्व्हाजाल आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्याने दिलेल्या अप्रतिम पासवर गोंझालो गार्सियाने पहिला गोल केला.

">यानंतर इंग्लंडचा स्टार ज्युड बेलिंगहॅमने संघाची आघाडी मजबूत केली. हंगामात सर्वाधिक गोल करणाऱ्या फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेने दूरवरून एक अचूक आणि वेगवान फटका मारत हंगामातील आपला २५ वा गोल नोंदवला, तर इब्राहिम डियाझने चौथा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. कार्व्हाजाल जेव्हा मैदानाबाहेर जात होता, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी 'गार्ड ऑफ ऑनर' देत त्याला मानवंदना दिली. या अखेरच्या फेरीत गुणतालिकेच्या तळाशी असलेल्या संघांमध्ये 'रेलिगेशन' (अवनती) टाळण्यासाठी जीवघेणी स्पर्धा पाहायला मिळाली. मॅलोर्काने आपला सामना जिंकूनही गोलफरकामुळे त्यांना दुसऱ्या विभागात जाण्यापासून स्वतःला वाचवता आले नाही. तर गेल्या वर्षी थेट युरोपियन चॅम्पियन्स लीग खेळणाऱ्या गिरोनाचा संघ यंदा ढिसाळ कामगिरीमुळे थेट दुसऱ्या विभागात घसरला, जो या हंगामातील सर्वात मोठा उलटफेर मानला जात आहे.



दुसरीकडे, बार्सिलोना क्लबकडून आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या पोलंडच्या दिग्गज स्ट्रायकर रॉबर्ट लेवांडोवस्कीने गोल झळकावून संघाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, व्हॅलेन्सियाने जबरदस्त पुनरागमन करत बार्सिलोनाचा ३-१ असा पराभव केला. इतर सामन्यांमध्ये, सेल्टा विगोने आगामी हंगामातील 'युएफा युरोपा लीग'साठी पात्रता निश्चित केली.


Tags
FIFA World Cupfootball matchFIFA World Cup 2026HalaMadrid2026 World Cup
Comments
Add Comment

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव

IND vs SL Galle Test : मानव सुथारचा फिरकीचा कहर; श्रीलंकेवर भारताचा 165 धावांनी दणदणीत विजय

गॉल : गॉलच्या मैदानावर भारतीय फिरकीचा असा कहर पाहायला मिळाला की श्रीलंकेचा डाव अखेर 206 धावांवर आटोपला! मानव

Aus vs Ban Test : डार्विनमधील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय; जॅक वेदरल्ड संघाबाहेर, मॅथ्यू रेनशॉला बोलावले

डार्विन : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात महत्त्वाचा बदल

Arjuna Award : बुद्धिबळात १९ व्या वर्षी विश्वविजेत्या झालेल्या महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार

वयाच्या १९व्या वर्षी विश्वविजेती, आता अर्जुन पुरस्काराची मानकरी; नागपूरच्या दिव्या देशमुखचा यशस्वी

2032 UCI Road World Championships : पुण्यात होणार युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२ स्पर्धा; आयोजनाला शासनाचे पाठबळ

पुणे : ग्रँड टूर – २०२६ स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२ चे यजमानपद