जळगाव : शरद पवार पवार हे पंतप्रधान मोदींकडे गेल्या दहा वर्षाचा हिशोब मागत आहेत. पण शरद पवार हे ५० वर्ष केंद्रात मंत्री होते, महाराष्ट्रातील जनता त्यांना सहन करत आहे. त्यांनी ५० राहिले निदान पाच वर्षाचा हिशेब महाराष्ट्राला द्यावा, अशी जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाजपाने येथे आयोजित केलेल्या युवा संमेलनात बोलताना केली.
भाजपाने नंदुरबार, धुळे, रावेर, जळगाव लोकसभा मतदारसंधातील युवकांसाठी मंगळवारी युवा संवाद संमेलनाचे आयोजन सागरपार्क मैदानावर केले होते. प्रथमच मतदान करणा-या विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या संमेलनास मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. यात युवतींची उपस्थिती लक्षणीय होती. अमित शहा यांचे सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
युवकांना मेरे दिलके टुकडे संबोधत त्यांनी भाषणास प्रारंभ केला. २०२४ ची लोकसभा निवडणूक ही भारताला आत्मनिर्भर बनवणारी असल्याचे सांगत ही निवडणूक युवकांची आहे. युवकांच्या भविष्याची असल्याचे सांगितले. युवकांनो तुम्ही प्रथम मतदान करत आहात. लोकतंत्र मजबूत करणा-या पक्षाला मत देण्याचे आवाहन करताना आज घराणेशाही साठी एक आलेले पक्ष देश मजबूत ठेवू शकत नाही हे सांगताना काँग्रेसच्या सोनिया गांधी या राहुलला पंतप्रधान करू पाहत आहेत तर उध्दव ठाकरे हे आदित्यला मुख्यमंत्री आणि शरद पवार हे आपल्या कन्येला मुख्यमंत्री करू पाहतात. ममता बॅनर्जी भाच्याला मुख्यमंत्री करू पाहतात. यात घराणे आहे. प्रत्येकाचा स्वार्थ आहे. तुम्हा युवकांचा विचार आहे कुठे असा सवाल करत तुमच्यासाठी तुम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे आहे, असे सांगितले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर टीका करताना, तिचा उल्लेख करताना तीनही चाके पंक्चर असलेली रिक्षा असा केला. शरद पवार ५० वर्ष मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राला धो धो धुतले तरी जनता सहन करत आहे, असा आरोप करत आहे ते पवार मोदींकडे दहा वर्षाचा हिशोब मागत आहेत. त्यांनी पन्नास राहू दया पण निदान पाच वर्षाचा तरी हिशोब जनतेला दयावा, अशी मागणी अमित शहा यांनी केली. काँग्रेसची कारकिर्द व भाजपाची तुलना करतांना मनमोहनसिंग यांनी सत्ता सोडतांना देशाची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावर होती ती आज पाचव्या स्थानार आहे आपल्याला येत्या पाच वर्षात तिस-या स्थानावर आणायची असल्याचे सांगत भाजपाने युवकांसाठी केलेल्या विकास कार्याची माहिती दिली. आगामी काळात भाजप करू इच्छीत असलेले प्रकल्प सांगतांना सोनिया गांधी राहुलला तिस-यांना लाँच करत आहेत . इंडिया आघाडीतल्या पक्षांना आपल्या मुलांची चिंता आहे असे सांगत तुम्हाला काय हवंय, असा सवाल युवकांना करताच मोदी मोदी असा जल्लोष झाला.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…