Prakash Ambedkar : यांचीच भांडणं संपली नाहीत, तर आमच्याशी काय चर्चा सुरु होणार?

प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं मविआच्या जागावाटपाचं सत्य


भंडारा : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) तोंडावर आलेल्या असताना महाविकास आघाडीमधील (MVA) जागावाटपाबाबतची धुसफूस संपायचे नाव घेत नाही. मविआमध्ये अजूनही जागावाटप झाले नसल्याची बातमी आहे. काँग्रेस शिवसेनेत १० जागांवरुन भांडणं सुरू आहेत. तर, काँग्रेस (Congress) आणि एनसीपी (NCP) यांच्यात ५ जागांवरुन भांडणं सुरू आहेत. म्हणजेच, ४८ पैकी १५ जागांवरुन महाविकास आघाडीतील पक्षांची भांडणं सुरू आहेत. तर मविआमध्ये वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) सामील करुन घेतले जाणार की नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. याबाबत प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) भंडारा येथील त्यांच्या जाहीर सभेत थेट भाष्य केलं.


प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या जागांची मागणी महाविकास आघाडीला अद्याप तरी मान्य नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच, अजूनही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येईल की नाही, यावर प्रश्नचिन्हच आहे. याबाबत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील वंचितच्या सहभागावर भाष्य केलं. ते म्हणाले, अद्याप आम्ही मविआमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही, हे मी सांगतो. आमच्यासाठी चर्चा कधी सुरू होईल, त्यांची भांडणं संपल्यानंतर. आता, त्यांचीच भांडणं सुरू झाली नाहीत, तर आमच्याशी चर्चा काय होणार आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाची अंदर की बात सांगितली.


'१२ ते १६ मार्च दरम्यान आचारसंहिता लागू होईल. आज ४ मार्च, किती दिवस शिल्लक राहिले आहेत. आता, यांचं भांडण मिटलं नाही तर, मग काय. मी अपेक्षा करतो की, ह्यांचं भांडण मिटेल आणि आमच्यासोबत चर्चा सुरू होईल', असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

Comments
Add Comment

'ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक भरती करा'

नागपूर : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये जिथे शून्य ते दहा किंवा शून्य वीस विद्यार्थी आहेत अशा अनेक

रोहित आर्याने विनापरवानगी शाळांकडून पैसे गोळा केले!

नागपूर : पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या एन्काऊंटर प्रकरणाची चर्चा मंगळवारी विधानसभेत झाली.

'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर

सातबारावर आता स्वतंत्र नाव लागणार नागपूर : राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडांवर

शरद पवारांच्या पक्षातील सूर्यकांत मोरे विरोधात हक्कभंग

जामखेड : जामखेड नगरपालिका निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सूर्यकांत मोरे

मंत्री नितेश राणे यांचे विधानपरिषदेत आश्वासन; महिलांच्या सुरक्षेसाठी विदेशातून 'हँड ग्लोज' मागवणार

नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मच्छीमार व्यवसायातील महिलांना कोळंबी सोलत असताना होणाऱ्या शारीरिक

गुटखा विक्रेत्यांना 'मकोका' लावणार!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करणार

नागपूर : "गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता.