Gautam Gambhir : मला राजकीय कर्तव्यापासून मुक्त करा; जेणेकरुन...

गौतम गंभीरची जे. पी. नड्डा यांच्याकडे मागणी


नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू (Cricketer) आणि भाजपा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ते पूर्व दिल्लीतील भाजप खासदार असून आता २०२४ ची लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढणार नसल्याची त्यांनी घोषणा केली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच गौतम गंभीर यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. तशी विनंती त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे कळवले आहे.


गौतम गंभीर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी माननीय पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विनंती केली आहे की, मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करा जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!, असं म्हणत त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.


गौतम गंभीर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीच्या जागेवर दमदार विजय मिळाला होता. तर क्रिकेटमध्ये त्यांनी भारतासाठी ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. गौतम गंभीर २०११ च्या वनडे वर्ल्ड कप विजेत्या टीमचे भाग होते. याशिवाय ते २००७ च्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियन टीमचेही एक भाग होते. ते सध्या पुन्हा एकदा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहेत.

Comments
Add Comment

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार

Sabarimala Temple Case : सबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणात केंद्र सरकारने मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले...

केरळमधील सबरीमला मंदिराबाबत (Sabarimala Temple Case) केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली. केंद्र