मसुरे : राजकारणातील यश भराडी देवीच्या आशीर्वादाने मिळाले आहे अशी माझी भावना आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची सत्ता आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये अबकी बार ४०० पार हे मिशन यशस्वी होऊ दे! असे साकडे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी आंगणेवाडी येथील भराडी देवीला घातले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास आंगणेवाडी येथे आई भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने स्वागत कक्षात त्यांचे आनंद आंगणे यांनी स्वागत केले. यावेळी भाविकांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, येणाऱ्या लोकसभेसह राज्यात सुद्धा याच विचारांची सत्ता येऊ दे. देशाला आत्म निर्भर बनवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या वेळी पुन्हा यश मिळु दे ही प्रार्थना आपण केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा उत्तम आरोग्य लाभून त्यांचा कारभार यशस्वी होऊ दे. लोकसभे संबंधी पक्ष जो निर्णय घेईल तो अंतिम असेल. हा मतदार संघ भाजपचा असल्याने लोकसभेचा उमेदवार भाजपचा असेल. येथील विरोधी खासदार आणि आमदार यांचा पराभव जनताच करणार आहे. तसेच आंगणे कुटुंबीयांनी सुयोग्य नियोजन केल्याने भाविकांना दर्शन सुलभ मिळत आहे. सर्व भक्तांना उत्तम आरोग्य लाभू दे अशी मनोकामना सुद्धा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.
यावेळी सौ. नीलम राणे, आमदार निरंजन डावखरे, भाजप नेते डॉ. निलेश राणे, आनंद आंगणे, रघुनाथ आंगणे, दीपक आंगणे, दिनेश आंगणे, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा परब, अशोक सावंत अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…