Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असताना दुसरीकडे आता मराठा आरक्षणाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात सदावर्तेंकडून दिवाणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.


राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाला आता मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. अॅड. जयश्री पाटील आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या आरक्षणाबरोबरच न्या. शुक्रेंच्या नियुक्तीवरही आक्षेप घेण्यात आला आहे.


अॅड.जयश्री पाटील यांच्याकडून राज्य सरकारने जारी केलेल्या १० टक्के मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी रोस्टर पद्धतीत केलेल्या बदलालाही आव्हान देण्यात आले आहे. तसेच, निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपेक्षाही जास्त मानधन दिले गेल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली नेमणूक चुकीची असल्याचा याचिकेत म्हटले आहे. त्याचप्रमाणे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.या प्रकरणी आरक्षणाला समर्थन देत विनोद पाटील यांच्याकडून हायकोर्टात कॅव्हेट दाखल झाली आहे.

Comments
Add Comment