Deepika & Ranveer : दीपवीरच्या घरी 'कुणीतरी येणार येणार गं!'

खास पोस्ट शेअर करत चाहत्यांनी दिली गुडन्यूज


मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या सेलिब्रिटींची लहान मुलं फारच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी आलिया व रणबीरने (Alia and Ranbir) राहा कपूरला (Raha Kapoor) माध्यमांसमोर आणले. तर नुकतेच अनुष्का-विराटने (Anushka Sharma And Virat Kohli)  अकाय (Akaay) नावाच्या मुलाला जन्म दिला. ट्वेल्थ फेल (Twelth fail) सिनेमामुळे चर्चेत आलेला अभिनेता विक्रांत मेस्सीदेखील (Vikrant Messy) नुकताच बाबा झाला आहे. तर रिचा चड्ढा आणि अलीफजल (Richa Chaddha & Alifazal) देखील आपल्या बाळाची प्रतिक्षा करत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची फेव्हरेट जोडी 'दीपवीर' (Deepveer) म्हणजेच दीपिका पादुकोण (Deepika Padukone & Ranveer Singh) आणि रणवीर सिंग यांच्या घरी नव्या बाळाचे आगमन होणार असल्याची चर्चा होती. या चर्चेला आता पुष्टी मिळाली असून दीपवीरने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.


दीपिका व रणवीरने बाळाच्या गोष्टींनी सजावट केलेलं एक पोस्टर शेअर करत त्यात 'सप्टेंबर २०२४' (September 2024) असं लिहिलं आहे. म्हणजे दीपिका आणि रणवीरच्या घरी सप्टेंबर महिन्यात नव्या बाळाचे आगमन होणार आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक चाहते ही बातमी ऐकण्यासाठी आतुरले होते, त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.





काही दिवसांपूर्वी 'बाफ्ता इव्हेंट'मधील (BAFTA Event) दीपिकाचा लूक चर्चेत आला होता. यामध्ये तिने गोल्डन रंगाची सुंदर शिमरी साडी परिधान केली होती. यात ती बेबी बंप लपवत असल्याचा चाहत्यांचा अंदाज होता. त्यामुळे दीपिकाच्या गरोदरपणाची चर्चा सुरु झाली. शिवाय ‘द वीक’च्या रिपोर्टनेही दीपिका गरोदर असल्याच्या चर्चांना पुष्टी दिली होती. मात्र, दीपवीरकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. आता खुद्द दीपवीरनेच नव्या बाळाच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगितल्याने लवकरच 'कुणीतरी येणार येणार गं!' हे पक्के झाले आहे.

Comments
Add Comment

Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,