नवी मुंबई : लातूर येथील मे.श्रीनाथ इंजिनियर या कंत्राटदाराने बनावट बँक गॅरेंटी सादर करुन पनवेल महापालिकेतील सार्वजनिक शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीची तसेच मलनि:सारण वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कोट्यवधींची कामे मिळवून पनवेल महापालिकेची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील कंत्राटदाराविरोधात बनावट कागदपत्रे तयार करुन पनवेल महापालिकेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या प्रकरणी तपास सुरु केला आहे.
सन २०२२ मध्ये पनवेल महापालिकेच्या मालकीच्या सर्व सार्वजनिक शौचालयांचे दोन वर्षासाठी निगा, दुरुस्ती व नुतनीकरणाचे तसेच सिडकोने विकसीत केलेल्या खारघर नोड मधील मलनि:सारण वाहिन्यांची दोन वर्षासाठी दुरुस्ती, सुधारणा व नुतनीकरण करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्यावेळी लातूर येथील मे.श्रीनाथ इंजिनियर तर्फे गोपालकृष्ण लड्डा या कंत्राटदाराने शौचालय देखभाल दुरुस्ती कामाच्या ई निविदेमध्ये २२ टक्के कमी दराची निविदा भरली होती. तसेच मलनि:सारण वाहिन्यांची दुरुस्ती, सुधारणा या कामाच्या ई निविदेमध्ये २३ टक्के कमी दराची निविदा भरली होती.
या दोन्ही निविदा कमी दराच्या असल्याने महापालिकेने ही दोन्ही कामे मे.श्रीनाथ इंजिनियर या कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेऊन त्याच्याकडुन शासन निर्णयाप्रमाणे पहिल्या कामासाठी ५८ लाख ९१ हजार ४२० रुपयांची अतिरिक्त सुरक्षा अनामत ठेव रक्कम (बँक गँरेंटी) तसेच दुसऱ्या कामासाठी ७३ लाख ७९ हजार ८०९ रुपयांची अतिरिक्त सुरक्षा अनामत ठेव रक्कमेची (बँक गँरेंटी) मागणी केली होती.
मात्र, मे.श्रीनाथ इंजिनियर या कंत्राटदाराने त्यावेळी लातूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे वरील रक्कमेचे अतिरिक्त सुरक्षा अनामत ठेव रक्कमेची स्वरूपातील दोन बनावट कागदपत्रे पनवेल महापालिकेकडे सादर करुन दोन्ही कामे मिळवली होती.
निविदेप्रमाणे या दोन्ही कामांची दोन वर्षाची मुदत संपत येत असताना मे.श्रीनाथ इंजिनियर या कंत्राटदाराने पनवेल महापालिकेकडे सादर केलेली बँक गॅरंटी ची दोन्ही कागदपत्रे बनावट असल्याची तक्रार काही दिवसापुर्वी पनवेल महापालिकेला प्राप्त झाली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने या दोन्ही बँक गॅरंटीच्या कागदपत्रांची संबंधित बँकेकडुन तपासणी करुन घेतली असता, दोन्ही बँक गॅरंटीची कागदपत्रे बनावट असल्याचे आढळुन आले. त्यानंतर पनवेल महापालिकेने या कंत्राटदारा विरोधात महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मे.श्रीनाथ इंजिनियर या कंत्राटदाराने पनवेल महापालिकेत बनावट बँक गँरेटी सादर करुन महापालिकेची फसवणुक केल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे संबधित कंत्राटदाराविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…