Ashish Shelar : पत्रकार पोपटलाल यांचा अग्रलेख की हग्रलेख?

Share

आमच्या कामांचं श्रेय घेण्यासाठी आवाज करणार्‍या राजकीय बगळ्यांना मुंबईकरच बाजूला करतील!

भाजपा आमदार आशिष शेलार यांचे उबाठाच्या संजय राऊत व आदित्य ठाकरेंना जबरदस्त टोले

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सामनाच्या अग्रलेखातून खालच्या पातळीची भाषा वापरत सत्ताधारी पक्षांवर टीका करतात. काल सामनाच्या अग्रलेखात त्यांनी भाजपा पक्ष (BJP Party) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर टीका केली. यावर काल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ‘स्वतःचा पक्ष संपलेल्या लोकांनी भाजपा संपवण्याची भाषा करु नये. संजय राऊतच्या दहा पिढ्या देखील भाजपाला संपवू शकणार नाहीत’, अशी टीका केली होती. यानंतर आता भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राऊतांचा ‘पत्रकार पोपटलाल’ असा उल्लेख करत आशिष शेलारांनी त्यांना चपराक लगावली आहे.

आशिष शेलार म्हणाले की, पत्रकार पोपटलाल यांचा अग्रलेख आज सामनामध्ये आला आहे. तो अग्रलेख आहे की हग्रलेख आहे? ते रात्री बसतात आणि सकाळी लिहितात. या बांडगुळ पक्षांना दिल्ली भाजपने जागा दाखवली आहे. संजय राऊत आता तुमच्या पक्षाला बैठकीसाठी नॅनो गाडी लागेल, अशी जहरी टीका त्यांनी संजय राऊतांवर केली आहे.

आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला

आशिष शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने बाजू नीट लावली नाही. त्यामुळे मराठा आरक्षण गेले होते. मराठा समाजाच्या प्रत्येक मागणीचा सरकार विचार करेल, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी काही राजकीय बगळे आवाज काढत आहेत. अशांना बाजूला सारण्यासाठी मुंबईकर तयार आहेत, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) लगावला आहे.

…त्यावेळी मनोज जरांगे गप्प का?

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर आशिष शेलार म्हणाले की, ‘मराठा समाजाला हे मान्य नाही, ते मान्य नाही, अशी भाषा मराठा समाजाला मान्य नाही. जे बोलतात त्या मागे स्क्रिप्ट कोणाची आहे? मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) काळात आरक्षण गेले त्यावेळी तुम्ही गप्प का बसला? शरद पवार (Sharad Pawar) इतकी वर्षे आरक्षण देऊ शकले नाही त्यावेळी गप्प का बसला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Recent Posts

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

3 minutes ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

27 minutes ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

1 hour ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: गिल-बटलरची तुफानी खेळी, गुजरातने केकेआरसमोर ठेवले १९८ धावांचे आव्हान

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…

1 hour ago