Marathi Movie : थोडं लूझ थोडं टाईट कॅरेक्टर... काय आहे अलीबाबा आणि चाळीशीतल्या चोरांचा मॅटर?

सुबोध भावे, मुक्ता बर्वे आणि तगड्या स्टारकास्टसह नवीन चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला...


मुंबई : अलीबाबा आणि चाळीस चोरांची कथा आपण लहानपणी ऐकली, पण अलीबाबा आणि चाळीशीतल्या चोरांची कथा ऐकली आहे का? या चोरांची एक भन्नाट, धमाकेदार आणि हलकीफुलकी कथा दाखवणारा नवा मराठी चित्रपट (New Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाळीशीतले हे चोर विवाहित आहेत हा त्यांचा गुन्हा आहे, अशा आशयावर आधारलेला 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' (Alibaba ani chalishitale chor) हा चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या चित्रपटाचा टीझर आऊट (Teaser out) झाला आहे.


खरं तर विवाहित असणं म्हणजे गुन्हा नव्हे, पण चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रत्येक कलाकार हातात आरोपीची पाटी घेऊन उभा आहे, आणि त्या पाटीवर 'गुन्हा-विवाहित' असं लिहिलं आहे. शिवाय या चोरांचं वयदेखील चाळीशीच्या आसपासच आहे, हे पाटी वाचून लक्षात येतं. आता यामागे नेमकं काय रहस्य आहे, हे चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांच्या लक्षात येणार आहे.


या चित्रपटातून तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावे (Subodh Bhave), मुक्ता बर्वे (Mukta Barve) यांच्यासह उमेश कामत (Umesh Kamat), श्रुती मराठे (Shruti Marathe), अतुल परचुरे (Atul Parchure), मधुरा वेलणकर (Madhura Velankar), आनंद इंगळे (Anand Ingale) ही कलाकार मंडळी यामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहेत. आजारपणानंतर अतुल परचुरे कामात सक्रिय झाले असून त्यांचा हा चित्रपट पाहण्यास चाहते उत्सुक असणार आहेत.





'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' या चित्रपटाची निर्मिती नितीन वैद्य प्रोडक्शन्स आणि मृद्गंध फिल्म्सने केली आहे. चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे तर दिग्दर्शनाची जबाबदारी आदित्य इंगळे यांनी सांभाळली आहे. २९ मार्च रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी