Nagpur Crime: नागपूरात खळबळ! भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला

नागपूर: नागपुर जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये नितीन शिमले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास जुनी शुक्रवारी परिसरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत अधिक तपास सुरु केला आहे. परंतु या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.



नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी



कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शिमले आणि आरोपी सोनू ठाकरे उर्फ पैलवान यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते. यावरून सोनू पैलवानने रविवारी रात्री जुनी शुक्रवारी चौकात नितीन शिमले याच्यावर चाकुने हल्ला केला. या हल्ल्यात शिमले गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस लगेच घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी जखमी नितीन यांना रुग्णालयात दाखल केले. तर मारेकरी सोनू ठाकरे हा घटनास्थळावरून फरार झाला असून सध्या पोलीस सोनू पैलवानचा शोध घेत आहे.


दरम्यान, जुन्या वादातून मित्र महेश ठाकरेने भाजपाच्या नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. धारधार शस्त्राने हा हल्ला केल्याने शिमले गंभीर जखमी झाले आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी शुक्रवारी परिसरातील ही घटना घडली. जुन्या हत्येच्या प्रकरणात नितीन शिमले व महेश ठाकरे आरोपी होते. सध्या नितीन शिमले यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांचा तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम