Satara: 'व्हॅलेंटाईन डे'ला चक्क शिक्षकाने विद्यार्थिनीला केला प्रपोज; 'तू का आली नाहीस म्हणत...'

सातारा: सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकापूर शहरात 'व्हॅलेंटाईन डे' ला शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका शिक्षकानेच ‘प्रपोज’ करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी मलकापूर शहरातील एका शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.



नेमकं प्रकरण काय?



१४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलविले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. परंतु शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवले आणि म्हणाला, "मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो", एवढंच नाहीतर पीडित मुलीचा हात पकडल्याचा आरोप आहे.



शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. ही घटना तिने मैत्रिणी व कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रविवारी कराड शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व