नाशिक : गेली चाळीस वर्षे संघर्ष केल्यानंतर तसेच दोनदा न्यायालयीन लढाईत रद्द झाल्यानंतर मराठा समाजाला दहा टक्के टिकणारे आरक्षण (Maratha reservation) देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या (Maratha Samaj)भावनांना न्याय दिला या शब्दात नाशिक (Nashik) शिवसेना सहसंपर्कप्रमुख व छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
२० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधी मंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ टक्के मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून हजार पेक्षा अधिक तर महाराष्ट्रातून पाच हजाराहून अधिक शिवसैनिकांनी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित हजारो शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
“एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला संवेदनशील मुख्यमंत्री लाभले आहेत. मराठा समाजाच्या अनेक वर्षांच्या दुःखावर त्यांनी फुंकर घातली आहे. या निर्णयामुळे कुणबी वगळून उर्वरित मराठा समाजालाही न्याय मिळणार आहे.”
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…