मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरील तोडग्यासाठी आज म्हणजेच मंगळवारी राज्य विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण लागू करण्याबाबतचा कायदा करण्यात येणार आहे.
मराठा समाजास नोकरी तसेच शिक्षणामध्ये १० टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले जाणार आहे. तसेच ओबीसीप्रमाणेच इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
गेल्या आठवड्याभरापासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. २६ फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे नियोजित अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मंगळवारी एकदिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी १० वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. नवीन वर्षातील हे पहिलेच अधिवेशन आहे त्यामुळे याची सुरूवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल.
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाच्या मागासलेपणाबद्दलचा अहवाल सरकारला सादर केला आहे. याआधीही दोनदा मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयात टिकू शकला नव्हता. त्यामुळे हा कायदा टिकवण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…