Shivneri : शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत 'हिंदवी स्वराज्य महोत्सव'

मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त राज्याचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४'चे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या जुन्नर शहरात तीन दिवस कला, संगीत, साहस आणि अध्यात्मविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, पर्यटक आणि सर्व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.


महाजन म्हणाले, हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ हा इतिहास, संस्कृती आणि साहस यांचा सुरेख संगम घडवणारा असेल. पर्यटन विभाग गेले वर्षभर आपल्या संस्कृतीवर आधारित वेगवेगळे महोत्सव साजरे करत आहे. आपली स्थानिक संस्कृती, समृद्ध वारसा याची माहिती नव्या पिढीला आणि पर्यटकांना होण्यासाठी महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.


पर्यटन सचिव जयश्री भोज म्हणाल्या, "अत्यंत काटेकोरपणे हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ चे आयोजन केले असून. हा महोत्सव यशस्वीरित्या साजरा करण्यासाठी आणि राज्यातील, देशातील त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नक्कीच मोलाची भूमिका बजावेल. राज्यातील गड -किल्ले प्रत्येक पर्यटन प्रेमींचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. शासन या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या परंपरा, आपला समृद्ध इतिहास याची उजळणीच या महोत्सवातून करेल. या महोत्सवाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती या सोहळ्याचा अविस्मरणीय अनुभव घेईल.



शिवनेरी फेस्टिवल २०२४ मध्ये विविध उपक्रम


पारंपरिक संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा समावेश असेलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, हस्तकला प्रदर्शन, चवदार आणि मनमोहक अशा पाककृती, कार्यशाळा, क्वाड बायकिंग, पेंटबॉल, तिरंदाजी, गिर्यारोहण, रॅपलिंग, झिपलायनिंग, स्पीड बोटींग, वॉल क्लाईंबिंग अशा साहसी खेळांचा अनुभव, कुकडेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, काशी ब्रह्मनाथ मंदिर, अष्टविनायक मंदिर, लेण्याद्रि मंदिर, ओझर मंदिर, ज्योतिर्लिंग मंदिर, भीमाशंकर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन, निरभ्र रात्री लेकसाईड ग्लँपिंग आणि स्टारगेझिंगचा आनंद अनुभवता येणार आहेत. विविध किल्ल्यांची चढाई करत स्वत:ला आव्हान द्यावे - किल्ले हडसर, निमगिरी - हनुमंतगड, नाणेघाटासोबत जिवधनगड, कुकडेश्वर मंदिरासोबत चावंडगड. दोन दिवसीय गिर्यारोहण स्पर्धेत सहभागी व्हावे, कँपिंगसोबत हरिश्चंद्रगड ट्रेक आणि हडपसर - निमगिरी - हनुमंतगड - नाणेघाट - जिवधन येथे गिर्यारोहण हा उपक्रम देखील आयोजित केला आहे.

Comments
Add Comment

राजस्थान, गुजरातमधून येणाऱ्या कांद्याने आणखी भाव कोसळण्याची शक्यता, शेतकरी अडचणीत

लासलगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्ये आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर

आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापा; शेतकरी परिषदेत बच्चू कडूंची जीभ घसरली

बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान

दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा झाडावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुणेकरांची वाहनखरेदी धडाक्यात, गतवर्षी पेक्षा यंदा १,१५२ वाहनांची वाढ

पुणे : पुणेकरांनी यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीसाठी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मी

गोखले बिल्डर्सच्या कंपन्यांमधून बाहेर पडल्याची कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीनीच्या व्यवहारावरून केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय

अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम अमरावती : विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासांत एकूण