मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अधिकृतरित्या भाजपामध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचे कौतुक केले. तसेच काँग्रेसला त्यांचा पक्ष आणि नेत्यांना सांभाळता येत नाही. आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली आहे हे कळत नाही. देशातील मुख्य धारेत जायला पाहिजे असे मुख्य नेत्यांना वाटते म्हणून नेते आमच्याकडे येत आहेत. आम्ही टार्गेट घेऊन चालत नाही. पण जे नेते योग्य वाटतात त्यांच्याशी आमची चर्चा आहे. हे खरं आहे, काही नेते आमच्या संपर्कात आहेत. जमिनीशी जोडलेल्या नेत्याशी आमचा संपर्क सुरू आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. राज्यातले एक जेष्ठ नेतृत्व भाजपमध्ये प्रवेश करत आहे. ज्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणूक गाजवली. विविध मंत्रीपदे भूषवली, दोनवेळा जे राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते अशोक चव्हाण आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाणांची मदत कुठे घ्यायची आम्हाला चांगलेच माहित असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या अनुभवाचा आम्ही फायदा घेऊ, राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा आमचे केंद्र करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अशोक चव्हाण दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले. त्यांचा रोल काय असेल याबाबत केंद्र सरकारसोबत बोलून निर्णय घेतला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मी कधीही कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही आणि करणार नाही. सभागृहात विरोधी भूमिका मी प्रमाणिक पणे केली. सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांशी सबंध होते ती एक परंपरा आहे. पक्ष जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करीन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा असे सांगितले नाही. मी अधिक भाष्य करणार नाही, योग्य वेळी बोलीन, असे अशोक चव्हाण म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…