Saturday, July 20, 2024
Homeदेशकतारमधून अशी झाली ८ भारतीयांची सुटका, मोदी-डोवाल यांनी सांभाळला मोर्चा

कतारमधून अशी झाली ८ भारतीयांची सुटका, मोदी-डोवाल यांनी सांभाळला मोर्चा

नवी दिल्ली: कतारमध्ये(quatar) ताब्यात घेतलेल्या भारताच्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. यातील ७ जण मायदेशातही परतले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत विधान केले त्यात म्हटले की आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचे स्वागत केले जातो.

कतारमध्ये या अधिकाऱ्यांना ऑगस्ट २०२२मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. गेल्यावर्षी कतारच्या न्यायलयाने त्यांना हेरगिरीच्या आरोपात दोषी ठरवताना फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान,यानंतर त्यांची शिक्षा कमी करण्यात आली होती.

१४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी कतारची राजधानी दोहा येथे जात आहे. त्याआधीच भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यूएई दौऱ्यानंतर कतारला पोहोचतील.

कोण होते हे भारतीय?

नौदलाच्या ज्या ८ माजी अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आले होते त्यात कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन वीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि सेलर रागेश आहेत.

या सर्व माजी अधिकाऱ्यांनी भारतीय नौदलात २० वर्षांपर्यंत सेवा केली होती. ते येथे महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. कमांडर पूर्णेदू तिवारी यांना २०२९मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सन्मानितही केले होते. तर कॅप्टन नवेज गिलला यांना प्रेसिडंट गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. आता कमांडर पूर्णेंदू तिवारी सोडून बाकी सर्व माजी अधिकारी भारतात परतले आहेत.

गेल्या वर्षी झाली होती फाशीची शिक्षा

या माजी अधिकाऱ्यांना ऑगस्ट २०२२मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र २५ ऑक्टोबरला ही बाब समोर आली होती. कमांडर पूर्णेंदू तिवारी यांची बहीण मीतू भार्गवने सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -