BMC : मुंबई महानगरपालिकेचे ५९९५४.७५ कोटींचे महाबजेट

Share
  • अर्थसल्ला : महेश मलुष्टे, चार्टर्ड अकाऊंटंट

भारताच्या अर्थव्यवस्थेवर या आधीचा लेख २ फेब्रुवारीला प्रकाशित झाला आणि अर्थसंकल्पात नेमके काय मिळाले हे जाणून घेण्याची सर्वसामान्यांची इच्छा असते. पण आजच्या लेखात केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर मत प्रदर्शन करणार नसून देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर लिहिणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प २ फेब्रुवारी २०२४ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जाहीर केला व त्यानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज रुपये ५९९५४.७५ कोटी इतके प्रास्तावित असून ते सन २०२३-२४ च्या रुपये ५४२५६.०७ कोटी इतक्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत १०.५०% ने जास्त आहेत.

महसूल उत्पन्न
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांमध्ये रुपये २८६९३.३० कोटी इतके प्रत्यक्ष महसुली उत्पन्न प्राप्त झाले होते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे महसुली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज रुपये ३३२९०.०३ कोटी एवढे प्रास्ताविण्यात आले होते. त्यात रुपये ३९२.३५ कोटी इतकी घट करून रुपये ३२८९७.६८ एव्हढे करण्यात आले होते. त्यापैकी डिसेंबर २०२३ महिना अखेर पर्यंत १९२३१.५५ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न बृहन्मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता अंदाजित महसुली उत्पन्न रुपये ३५७४९.०३ कोटी इतके प्रास्ताविले असून ते सन २०२३-२४ च्या तुलने रुपये २४५९ कोटीने जास्त आहे.

अंदाजित महसुली उत्पन्नाचे विभाजन पुढीलप्रमाणे आहे. जकातीपोटी भरपाई म्हणून रुपये १३३३१.६३ कोटी, मालमत्ता करापोटी मिळणारे उत्पन्न रुपये ४९५० कोटी, विकास नियोजन खात्यातील ५८०० कोटी, गुंतवणुकीवरील व्याज रुपये २२०६.३० कोटी, जल आणि मलनिःसारण आकारापोटी रुपये १९२३.१९ कोटी, राज्य शानाकडून अनुदान रुपये १२४८.९३, पर्यवेक्षण आकार रुपये १६८१.५१ आणि इतर ४६०७.४७ कोटी रुपये असे आहे.

महसूल खर्च
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये, महसुली खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज रुपये २५३०५.९४ कोटींवरून रुपये २४६३३.३४ कोटी असे सुधारित करण्यात आले आहेत. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांमध्ये महसुली खर्चाकरिता रुपये २८१२१.९४ कोटी इतके अर्थसंकल्पीय अंदाज प्रस्ताविण्यात आले आहेत.

भांडवली खर्च
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये, भांडवली खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज रुपये २८८८४.८० कोटींवरून रुपये २५३१५.८१ कोटी असे सुधारित करण्यात आले आहेत. माहे डिसेंबर २०२३ अखेरीपर्यंत भांडवली खर्च रुपये १०३४३.३८ कोटी असून तो सन २०२३-२४ च्या सुधारित अंदाजाच्या ४०.८६ % आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांमध्ये भांडवली खर्चाकरिता रुपये ३१७७४.५९ कोटी इतके अर्थसंकल्पीय अंदाज प्रस्ताविण्यात आले आहेत.

२०२४-२५ या वर्षाच्या अंदाजित खर्चातील प्रामुख्याने करण्यात येणाऱ्या कामांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मुंबई सागरी किनारा मार्गासाठी २९०० कोटी रुपये, भांडुप संकुल येथे २००० द. ल. लि. क्षमतेचा जल शुद्धीकरण प्रकल्प रुपये ३६० कोटी, मुंबई पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी ३५० कोटी, गोरेगाव – मुलुंड लिंक रोडसाठी रुपये १८७० कोटी, आश्रय योजना रुपये १०५५ कोटी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प वेस्ट टू एनर्जीसह रुपये २३० कोटी, मिठी नदी प्रकल्पाची कामे रुपये ४५१.७५ कोटी, नद्या पुनरुज्जीवन ३५७ कोटी रुपये, मुंबई सागरी किनारा मार्ग ११३० कोटी रुपये इत्यादींवर करण्यात येणार आहेत.

तसेच मुख्यमंत्री शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण राबवण्यासाठी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात रुपये ५०० कोटी, बेस्ट उपक्रमास अर्थसाह्य म्हणून रुपये ८०० कोटी, माहिती तंत्रज्ञान उपक्रमास रुपये ३१.२० कोटी तरतूद करण्यात आली आहे. अंदाजित खर्च हा अंदाजित उत्पन्नाच्या अधिक असल्यामुळे तात्पुरत्या अंतर्गत हस्तांतरणाद्वारे उभारण्याचे सदरच्या अर्थसंकल्पात नमूद केले आहे.

एकंदरीत अर्थसंकल्प पाहता तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिकमध्ये सत्ता असताना सीएसआरच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबवण्यात आले होते, तसेच काही प्रकल्प ‘सीएसआर’मार्फत करता येईल का याचा विचार होणे देखील आता गरजेचे आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago