साईसंस्थान सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे १७ उमेदवार विजयी

माजी संचालक विठ्ठल पवार यांनी सत्ताधारी पॅनलचा उडविला धुव्वा


शिर्डी (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सहकारी सोसायटीमध्ये अग्रेसर तसेच राज्याचे लक्ष लागून असणाऱ्या श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट कॉ.ऑफ सोसायटीच्या निवडणुकीत माजी संचालक विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने सत्ताधारी जनसेवा पॅनलसह हनुमान पॅनलचा १७ /० ने धुव्वा उडवत सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले असून इतिहास रचला आहे.


दरम्यान साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत १७ जागेसाठी आता ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या लढतीत दोन अपक्षांसह हनुमान जनसेवा पॅनल, जनसेवा पॅनल व परिवर्तन पॅनल असे तीन पॅनलमध्ये रविवारी सकाळी ८ वाजेपासून साईनाथ माध्यमिक विद्यालय येथे मतदानाला शांततेत सुरुवात झाली.पंचक्रोशीतील संस्थानच्या कर्मचाऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या या सोसायटीच्या निवडणुकीसाठी १६६६ सभासदांपैकी ९७.२२ टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.माजी चेअरमन राजेंद्र जगताप यांनी हनुमान पॅनल उभा केला असून त्यांची निशाणी कपबशी होती.


हनुमान पॅनलच्या १७ उमेदवारांमध्ये बापूसाहेब कोते यांना ४३० डॉ प्रितम वडगावे यांना २८५ राजेंद्र बोठे यांना १७२ रायभान डांगे यांना २३७ मिनीनाथ कोते यांना २३८ देवानंद शेजवळ यांना २४७ संदीप जगताप यांना १६८ नामदेव सरोदे यांना २६२ भाऊसाहेब दिघे यांना १८३ प्रमोद गायके यांना २७१ वसंत चौधरी यांना २१० सुनील लोंढे यांना २३४ ज्ञानदेव शिंदे यांना १५८ पांडुरंग धुमसे यांना २२३ रमेश शेलार यांना १९६ प्रतिभा बनसोडे यांना २२९ मते मिळाली.सत्ताधारी गटाकडून प्रतापराव कोते यांनी जनसेवा पॅनलच्या शिट्टी या चिन्हावर प्रतापराव कोते यांना ५५२ यादवराव कोते यांना ५०२ अरुण जाधव यांना ३८६ सुनील डांगे यांना ४१९ रवींद्र चौधरी यांना ३७० बाळासाहेब थोरात यांना ३२० प्रल्हाद कर्डिले यांना ३५९ बाळासाहेब पाचोरे यांना २९३ बापूसाहेब गायके यांना ४१९ डॉ संदीप शेळके यांना ३२१ डॉ महिंद्र तांबे यांना ५५३ मनोज साबळे यांना ३७२ विजय हिरे यांना २११,जयराम कांदळकर यांना ४८२ राजेंद्र भालेराव यांना ३७६ वैशाली सुर्वे यांना ५२४ मीना वाळे यांना ३३३ मतं मिळाली.


तसेच विद्यमान संचालक विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये छत्री या चिन्हावर पोपटराव कोते यांना ७९४ भाऊसाहेब कोकाटे यांना ८३७ रवींद्र गायकवाड यांना ७१८ मिलिंद दुनबळे यांना ७६९ संभाजी तुरकणे यांना ८२४ इकबाल तांबोळी यांना ६६७ विनोद कोते यांना ७८७ तुळशीराम पवार यांना ७४९ देविदास जगताप यांना ८१३ कृष्णा आरणे यांना ८४५ भाऊसाहेब लवांडे यांना ७०८ महादेव कांदळकर यांना ८४७ विठ्ठल पवार यांना १२३४ संभाजी गागरे यांना ८९६ गणेश आहेर यांना १०२१ सुनंदा जगताप यांना ९२७ लता बारसे यांना ८६३ मतं मिळाली आहे तर अपक्ष उमेदवारांमध्ये किरण भोसले यांना ६५ अमृत जगताप यांना ५९ मतं पडली.या चुरशीच्या लढतीत हनुमान पॅनलच्या तसेच जनसेवा पॅनलसह अपक्ष उमेदवारांचा पराभव झाला असून परिवर्तन पॅनलचे १७ उमेदवार विजयी झाले आहेत.यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्थेचे दुय्यम निबंधक रावसाहेब खेडकर यांनी कामकाज बघितले तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव नबाजी डांगे यांनी काम पाहिले.

Comments
Add Comment

Pune Crime News : भरदिवसा थरकाप उडवणारा खून; तरुणाला कोयत्याने मारहाण करून दगडाने ठेचलं अन्...

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, येथील कायदा आणि

गडचिरोलीत नगराध्यक्षपदाचा सामना ठरला, प्रणोती निंबोरकर विरुद्ध कविता पोरेड्डीवार आमनेसामने

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील तीन नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वेग

पुणे स्टेशनला दिलासा! एक्स्प्रेस गाड्यांसाठी हडपसर नवे टर्मिनल

पुणे : पुण्यातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. पुणे जंक्शनवरील वाढत्या

जामनेर नगराध्यक्षपदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन निवडणुकीच्या रिंगणात!

जामनेर : राज्यातील तब्बल २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे त्याच अनुशंघाने

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

पुणे : राजगड किल्ला सर करण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीच्या डोक्यात दगड पडल्याने तरुणी जखमी झाली आहे.

वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकांवर आधारित

मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस फक्त वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकेवर