Domino's Pizza : ठाण्यात डॉमिनोज पिझ्झाच्या कर्मचार्‍याचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू

ठाणे : ठाण्याच्या वर्तकनगर येथील डॉमिनोज पिझ्झाचा (Domino's Pizza) कर्मचारी साफसफाई करताना वीजेचा धक्का (electric shock) लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत कर्मचार्‍याचे नाव महेश अनंत कदम असून तो २४ वर्षांचा होता. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्येही कैद झाली आहे.


वर्तकनगर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. वृद्ध आईसोबत महेश राहत होता. तो घरातील एकमेव कमवता व्यक्ती होता. सुरूवातीला महेश डिलिव्हरी बॉय म्हणून डॉमिनोज मध्ये काम करत होता. नंतर त्याचे काम बघून त्याला ठाण्याच्या वर्तकनगर मधील नळपाडा भागातील डॉमिनोजच्या दुकानात काम देण्यात आले.





महेशने मंगळवारी रात्री नाईट शिफ्ट केली होती. ओव्हरटाईम करून बुधवारी सकाळी लवकर घरी जाण्यापूर्वी त्याने डोमिनोजमध्ये नेहमी प्रमाणे साफसफाई केली. बुधवारी सकाळी प्रेशर पाण्याने साफसफाई करताना वीजेची तार त्याला लागली आणि झटका लागून त्याचा मृत्यू झाला.


पोलिसांनी महेशचा मृतदेह ताब्यात घेत तो पोस्ट मार्टमसाठी पाठवला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


दरम्यान, डॉमिनोज मधील या घटनेनंतर कायदेशीर कारवाई करत मृत महेशच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी डॉमिनोज पिझ्झा कंपनीकडे काम सुरू असताना विजेचा धक्का लागल्याने महेशच्या पश्चात त्याच्या वृद्ध आईला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे