Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेDomino's Pizza : ठाण्यात डॉमिनोज पिझ्झाच्या कर्मचार्‍याचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू

Domino’s Pizza : ठाण्यात डॉमिनोज पिझ्झाच्या कर्मचार्‍याचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू

ठाणे : ठाण्याच्या वर्तकनगर येथील डॉमिनोज पिझ्झाचा (Domino’s Pizza) कर्मचारी साफसफाई करताना वीजेचा धक्का (electric shock) लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत कर्मचार्‍याचे नाव महेश अनंत कदम असून तो २४ वर्षांचा होता. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्येही कैद झाली आहे.

वर्तकनगर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. वृद्ध आईसोबत महेश राहत होता. तो घरातील एकमेव कमवता व्यक्ती होता. सुरूवातीला महेश डिलिव्हरी बॉय म्हणून डॉमिनोज मध्ये काम करत होता. नंतर त्याचे काम बघून त्याला ठाण्याच्या वर्तकनगर मधील नळपाडा भागातील डॉमिनोजच्या दुकानात काम देण्यात आले.

महेशने मंगळवारी रात्री नाईट शिफ्ट केली होती. ओव्हरटाईम करून बुधवारी सकाळी लवकर घरी जाण्यापूर्वी त्याने डोमिनोजमध्ये नेहमी प्रमाणे साफसफाई केली. बुधवारी सकाळी प्रेशर पाण्याने साफसफाई करताना वीजेची तार त्याला लागली आणि झटका लागून त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी महेशचा मृतदेह ताब्यात घेत तो पोस्ट मार्टमसाठी पाठवला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, डॉमिनोज मधील या घटनेनंतर कायदेशीर कारवाई करत मृत महेशच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी डॉमिनोज पिझ्झा कंपनीकडे काम सुरू असताना विजेचा धक्का लागल्याने महेशच्या पश्चात त्याच्या वृद्ध आईला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -