मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे काका-पुतण्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मात्र, अजित पवारांकडे बहुमत असल्याने निवडणूक आयोगाने (Election commission) निकाल अजितदादांच्या बाजूने दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळाचं चिन्ह अजितदादांना मिळाल्याने निवडणुका तोंडावर आल्या असताना शरद पवार गटाला प्रचंड मोठा धक्का बसला. हा निर्णय अमान्य असल्याने शरद पवार गटात सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अजितदादांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत कॅव्हेट (Caveat) दाखल केली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली जात आहे. मात्र यापूर्वीच अजित पवार गटाने मागणी केली आहे की विरोधी पक्षाकडून प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी बाजू मांडण्याची संधी अजित पवार गटाला मिळावी. अजित पवार गटाने कॅव्हेट दाखल करत सर्वोच्च न्यायालयात शरद पवारांकडून या प्रकरणात कुठलीही याचिका दाखल झाल्यास त्यावर एकतर्फा निर्णय घेतला जाऊ नये असे म्हटले आहे.
कॅव्हेट म्हणजे इशारा’ किंवा ‘सावधानपत्र’. एखाद्या व्यक्तीला त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या किंवा दाखल होणाऱ्या दाव्याची पूर्वसूचना देण्यात यावी, त्याशिवाय त्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयाने कोणताही एकतर्फा हुकूम देऊ नये, याकरिता करण्यात आलेला अर्ज म्हणजे कॅव्हेट. ही न्यायालयाला देण्यात आलेली एक कायदेशीर नोटीस असते.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…