कणकवली : ‘माझ्या बोलण्यामध्ये मी मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान म्हणून केला होता. त्यामुळे खूप लोकांना हिरव्या मिरच्या झोंबल्या. सतत माझ्याबद्दल मालेगावमध्ये प्रेस घेणं, नोटिसा पाठवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर होत आहे. मालेगाव आमच्या महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि महाराष्ट्रात राहून जर कोणी पाकिस्तानचा उदोउदो करणार असेल, तर यावर आम्ही आजही बोलणार, उद्याही बोलणार आणि कितीही नोटिसा पाठवल्या तरी बोलणार’, अशी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तंबी दिली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मालेगावच्या (Malegaon) मुद्द्यावर भाष्य केले तसेच पंतप्रधानांवर वारंवार टीका करणार्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही सुनावले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाजपच्या वाटेवर असल्याचेही नितेश राणे म्हणाले.
मालेगावमध्ये राहून पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणार्या लोकांचा व्हिडीओ यावेळी नितेश राणे यांनी माध्यमांसमोर दाखवला. ते म्हणाले, “पाकिस्तानात चालणार्या गोष्टी इथे करणार्यांबद्दल बोलायचं नसेल, तर ते आमच्या धर्मात आणि राष्ट्रवादात बसत नाही. म्हणून त्या त्या पातळीवर आम्ही याबद्दल विश्लेषण आणि उत्तर देऊ, असं नितेश राणे म्हणाले.
काही दिवसांअगोदर मालेगाव शहरामध्ये ३०० कोटींपेक्षा जास्त वीज चोरी होण्याचं सत्य मी आपल्यासमोर मांडलं होतं. त्यासंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची बैठक झाली, असाही उल्लेख मी त्यावेळी केला होता. आता अभिमानाने मी सांगू शकतो की त्या बैठकीचे पडसाद मालेगावमध्ये पाहायला मिळत आहेत. काही अधिकार्यांचं पथक तयार केलं आहे आणि त्यानुसार या सगळ्या गोष्टींचा पुनर्लाभ होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी मी देवेंद्र फडणवीसजी आणि व्ही. जी शेखर यांचे मी मनापासून आभार मानतो.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नेहरुंचं सत्य सर्वांना दाखवलं. नेहरुजींनी आपल्या भारताला कसं आळशी बनवलं याचं अतिशय उत्तम विश्लेषण मोदीजींनी सभागृहात केलं आणि अपेक्षेप्रमाणे गांधी कुटंबाचा नवा नोकर संजय राजाराम राऊतला मिरच्या झोंबल्या. पण मला त्याला एक प्रश्न विचारायचाय की, एका बाजूने तू मोदीजींवर टीका करतोस, एका बाजूने भाजपवर गरळ ओकतोस, एका बाजूने सामनाचा अग्रलेख हेमंत सोरेन हे कसे झुकले नाहीत याविषयी अग्रलेख लिहितोस पण दुसर्या बाजूने तुझ्या मालकाने पूर्ण कोकण दौर्यामध्ये मोदीजींचं गुणगान गायला सुरुवात केली आहे. मोदीजींना आम्ही शत्रू मानत नाहीत, ते आम्हाला मानतात, असं तो म्हणतो. म्हणजे काही दिवसांपासून मी तुम्हा सगळ्यांना जे सांगतोय की उद्धव ठाकरे पलटी मारण्याच्या पूर्ण तयारीत आहे, ते खरं आहे.
पुढे नितेश राणे म्हणाले, दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेचे कोणते सहकारी अमितभाईंच्या घराबाहेर आणि मोदीजींना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत, याचा मी काही दिवसांत फोटोंसकट पुरावा देणार आहे. मी आजही उद्धव ठाकरेंना आवाहन करतो की दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या की मी भाजपशी युती करण्यास आतुर नाही. एका बाजूने टीका करायची आणि दुसर्या बाजूने भाजपचे उंबरठे झिजवायचे, याबद्दल महाराष्ट्राला माहिती मिळाली पाहिजे.
संजय राजाराम राऊत विचारतो की, मोदीजींनी देशासाठी काय केलं? पण तुला याची माहिती द्यायची काय गरज? काल तुझा मालक आणि मालकीण वंदे भारत ट्रेननेच चिपळूणपासून मुंबईपर्यंत गेले. ही वंदे भारत मोदीजींमुळेच झाली आहे. त्यामुळे संजय राऊतला सांगेन की तुझ्या टिकाटिप्पणीला, तुझ्या अग्रलेखाला विरोधक सोड, तुझा स्वतःचा मालक तरी भीक घालतोय का, याबद्दल थोडा विचार कर, असा सल्ला नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…