प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुफ्ती सलमान अजहरींना अटक

मुंबई: गुजरातच्या जुनागढमध्ये प्रक्षोभक भाषण दिल्या प्रकरणी गुजरात एटीएसकडून रविवारी मुंबईचे इस्लाम अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक करण्यात आली. यादम्यान, त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. जुनागढ येथे काही दिवसांपूर्वी दिलेल्या भाषणात गुजरात पोलिसांनी मुस्लिम मौलाना आणि इतर दोन लोकांविरोधात एफआयआर दाखल केला होता.पोलिसांनी मुफ्ती सलमान अजहरी यांना ताब्यात घेतले.


मुफ्ती सलमान अजहरी यांना मुंबईच्या घाटकोपर स्टेशन येथे ठेवण्यात आले. यावेळेस पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मौलाना यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की मुफ्ती सलमान तपासात संपूर्ण मदत करण्यास तयार आहेत.



समर्थकांना आंदोलन न करण्याचे अपील


दिवसाच्या वेळेस मुफ्ती सलमान अजहरी यांचे सोशल मीडिया हँडलवरून अनेक ट्वीट्स करण्यात आले. यात एकामध्ये म्हटले त्यांना गुजरात एटीएस, मुंबई एटीएस आणि चिराग नगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ११.५६ वाजता ताब्यात घेतले.


दरम्यान, प्रक्षोभक भाषण प्रकरणात आपल्या समर्थकांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नये असे अपील करताना मौलाना दिसले.



काय आहे संपूर्ण प्रकरण?


मौलाना यांच्यावर ३१ जानेवारीला जुनागढ येथील एका कार्यक्रमादरम्यान प्रक्षोभक भाषण दिले असा आरोप आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मुफ्ती सलमान, कार्यक्रमाचे आयोजन मोहम्मद युसुफ मलिक आणि अजीम हबीब ओडेदरा यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ बी आणि ५०५(२) अंतर्गत एफआयआर दाखल केला.

Comments
Add Comment

Mumbai Lake : तुळशी, विहार,तानसा पाठोपाठ आता मोडकसागर तलावही भरले

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणार्‍या विहार तुळशी, तानसा या तलावांपाठोपाठ मोडकसागर तलावही गुरुवारी रात्री २

Mumbai Water Supply : मुसळधार पावसाचा दिलासा! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा साठा ६९.७४ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईत (Mumbai) कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा (Heavy Rain) परिणाम आता जलाशयांतील (Reservoirs) पाणीसाठ्यावर (Water Stock)

Mumbai News : मुंबईत आजपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी

५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई; सभा, संमेलने, मिरवणुका काढण्यास बंदी मुंबई : कायदा व सुव्यवस्था अबाधित

FDA : महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनवर एफडीएची धाड

तत्काळ सेवा बंद करण्याचे दिले निर्देश मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये (Canteen) ताकाच्या

Mumabi News : समुद्राच्या मोठ्या भरतीने चौपाट्यांवर कचऱ्याचा खच

दहा दिवसांमध्ये २ हजार ४९९ मेट्रीक टन कचरा केला जमा मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि

BMC News : मुंबईकरांना जागतिक दर्जाची, सुलभ आणि उत्तरदायी आरोग्यसेवा

- मुंबई महानगरपालिका बनवत आहे टप्पेनिहाय आराखडा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील नागरिकांना दर्जेदार,