Mumbai News : मुंबईत आजपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी

५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई; सभा, संमेलने, मिरवणुका काढण्यास बंदी


मुंबई : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने २३ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण मुंबई (Mumbai) शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. विविध गोपनीय स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता तसेच मानवी जीवन व मालमत्तेच्या हानीची भीती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार, २३ जुलै रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण मुंबईत ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या बेकायदेशीर एकत्र येण्यावर आणि हालचालींवर कायदेशीर बंदी असेल.



मुंबई पोलीस (Mumbai Police) कायद्यातील विशेष तरतुदींचा वापर करून पोलीस उपआयुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी हे आदेश जारी केले आहेत. या कालावधीत शहरात कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर सभा, संमेलन किंवा मिरवणुका काढण्यास संपूर्ण मनाई असेल. तसेच अशा कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड पथके आणि फटाक्यांच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने या नियमांमधून काही महत्त्वाच्या बाबींना वगळले आहे. लग्नसोहळे, कौटुंबिक समारंभ, अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्काराच्या सभांना या जमावबंदीतून विशेष सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कंपन्या, सहकारी संस्था आणि विविध संघटनांच्या दैनंदिन कायदेशीर बैठका किंवा सामाजिक मेळावे नेहमीप्रमाणे घेता येतील.

शहरातील सांस्कृतिक व व्यावसायिक व्यवहार सुरळीत राहावेत यादृष्टीने चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच करमणुकीच्या ठिकाणी कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांना एकत्र येण्याची मुभा असेल. शासकीय व निमशासकीय कार्यालये, न्यायालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाला यातून वगळण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शाळा व महाविद्यालयांमधील नियमित सत्रे आणि कारखाने, दुकाने व व्यापारी आस्थापनांमधील दैनंदिन व्यावसायिक गर्दीवर ही बंदी लागू होणार नाही. याशिवाय, स्थानिक पोलीस उपआयुक्त किंवा सक्षम अधिकाऱ्यांची विशेष परवानगी असलेल्या सभा व मिरवणुकांनाही यातून सवलत दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक