मोदी सरकारच्या जाहिरातीवर काळे फासल्याप्रकरणी माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला अटक

मुंबई: मोदी सरकारच्या जाहिरातीवर काळे फासल्याप्रकरणी माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र तसेच काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली.


नागपूर जिल्हा परिषदेसमोर मोदी सरकारच्या विकसित भारत ही जाहिरात लावण्यात आली होती. या जाहिरातीवर त्यांनी काळ फासले. या जाहिरातीबाबत संताप व्यक्त करत त्यांनी या जाहिरातीवर काळं फासलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.


कुणाल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी जिल्हा परिषद परिसरात आंदोलन केले होते. यावेळेस त्यांनी जिल्हा परिषदेसमोर लावलेल्या जाहिरातीवर संताप व्यक्त करत काळे फासले. तसेच जाहिरातीवरील मोदी शब्दावरही छेडछाड केली. या प्रकरणी कुणाल राऊत यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतर कुणाल आणि त्यांचे सहकारी बेपत्ता होते. अखेर रविवारी सायंकाळी अटक कऱण्यात आली.

Comments
Add Comment

पुणे–कोल्हापूर प्रवासाला वेग; राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

पुणे : पुणे आणि कोल्हापूर दरम्यानचा रस्तेप्रवास लवकरच अधिक जलद आणि सुलभ होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करणार राष्ट्रवादीच्या आमदारांशी 'वन टू वन' चर्चा

मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात अनेक

Satara: 'व्हॅलेंटाईन डे'ला चक्क शिक्षकाने विद्यार्थिनीला केला प्रपोज; 'तू का आली नाहीस म्हणत...'

सातारा: सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकापूर शहरात 'व्हॅलेंटाईन डे' ला शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी

Nagpur Crime: नागपूरात खळबळ! भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला

नागपूर: नागपुर जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका

JEE Main 2026 Session 1 Result: जेईई मेनचा निकाल आज जाहीर होणार, 'या' वेबसाईटवर पाहू शकता अपडेट्स

JEE Main 2026 Session 1 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) आज जेईई (मेन) २०२६ सत्र १ चा (JEE Main 2026 Session 1) निकाल जाहीर करणार आहे. मूळ निकाल १२

Mahashivratri 2026: श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त