Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीKunal Raut : पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासणार्‍या काँग्रेसच्या कुणाल राऊतविरोधात भाजपचं आंदोलन

Kunal Raut : पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासणार्‍या काँग्रेसच्या कुणाल राऊतविरोधात भाजपचं आंदोलन

काँग्रेसकडूनही मिळाला घरचा आहेर

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पोस्टरला काळं फासल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांच्याविरोधात नागपूर जिल्हा परिषदेसमोर (Nagpur Zilla Parishad) भाजपने जोरदार आंदोलन (BJP Protest) केले. तसेच काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर बँक घोटाळ्यात आरोपी ठरलेल्या सुनील केदार यांचा फोटो छापण्यात आला होता. हे प्रकरणही या आंदोलनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी उचलून धरले. दरम्यान, काल कुणाल राऊत यांना अटक करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासण्याचा प्रकार घडला होता. शिवाय जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे, म्हणून अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर काँग्रेसच्या सदस्यांनी सुनील केदार यांचा फोटो छापला होता. तेव्हा एका दोषसिद्ध आरोपीचा फोटो जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर का? या भाजप सदस्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषदेविरोधात कारवाई करण्यात आली होती. आज भाजपने या दोन्ही प्रकरणांना उचलून जिल्हा परिषदेच्या समोर जोरदार आंदोलन केले.

नागपूर जिल्हा परिषद म्हणजे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचं दुकान झालं आहे. जिल्हा परिषद बरखास्त करा, अशी मागणी भाजपने केली. जिल्हा परिषदेसमोरच्या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरत भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. जिल्हा परिषदेत प्रचंड भ्रष्टाचार केले जात असून जिल्हा परिषद बरखास्त करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली.

कुणाल राऊत यांना काँग्रेस पक्षाकडूनच घरचा आहेर

भारत सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेच्या पोस्टरवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासण्याच्या कृतीला आपले समर्थन नसल्याची भूमिका नागपूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष काँग्रेस नेत्या कुंदा राऊत म्हणाल्या, ‘पंतप्रधान हे कोणत्याही पक्षाचे नाहीत ते देशाचे आहेत. त्यामुळे ही कृती समर्थनीय नाही.’ त्यामुळे याप्रकरणी कुणाल राऊत यांना पक्षातूनच घरचा आहेर मिळाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -