मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी ऑलराऊंडर आपल्या विधानांमुळे बऱ्यादचा चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांचे शिखर उभे करणाऱ्या सरफराज खानला टीम इंडियात स्थान न दिल्याने केलेल्या प्रतिक्रियेमुळे इरफान पठाण चांगलाच चर्चेत होता. मात्र यावेळेस चर्चा क्रिकेटची नव्हे तर त्याच्या खासगी जीवनाबद्दल होत आहे.
लग्नाच्या ८ वर्षानंतर पहिल्यांदा त्याने आपल्या पत्नीची झलक चाहत्यांना दाखवली आहे. टीम इंडियाचा स्टार माजी ऑलराऊंडर इरफान पठाण सातत्याने चर्चेत राहत असतो. यावेळेस त्याच्या खाजगी जीवनाबद्दल चर्चा होत आहे. खरंतर २०१६मध्ये लग्न बंधनात अडकलेला हा भारतीय क्रिकेटर आपल्या पत्नीसोबतचे फोटो तर वारंवार शेअर करत असतो. मात्र यावेळेस त्याने असे काही केले आहे की जोरदार चर्चा होत आहे.
Infinite roles mastered by one soul – mood booster, comedian, troublemaker, and the constant companion, friend, and mother of my children. In this beautiful journey, I cherish you as my wife. Happy 8th my love ❤️ pic.twitter.com/qAUW8ndFAJ
— Irfan Pathan (@IrfanPathan) February 3, 2024
इरफान पठाणने लग्नाच्या ८व्या वाढदिवसानिमित्त पत्नी सफा बेगसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची खास बात म्हणजे यात त्याने पत्नीचा चेहरा लपवलेला नाही. याआधी त्याने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये सफा हे हिजाबमध्ये होती अथवा तिने आपला चेहरा हाताने लपवलेला होता.
इरफानने लग्नाच्या ८व्या वाढदिवसानिमित्त एक प्रेमळ मेसेज आपल्या पत्नीला लिहित तिच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले. एकच व्यक्ती किती साऱ्या भूमिका निभावण्यात माहीर असते. मूड चांगला करणारी, कॉमेडियन, ट्रबलमेकर, प्रत्येक स्थितीत साथ देणारी, फ्रेंड, माझ्या मुलांची आई. आपल्या जीवनातील सुंदर प्रवासासाठी मला तुझी साथ भेटली. लग्नाच्या ८व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.