Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीMahalaxmi race course : महालक्ष्मी रेसकोर्सवर लंडन सेंट्रल पार्कप्रमाणे उभारणार मुंबई सेंट्रल...

Mahalaxmi race course : महालक्ष्मी रेसकोर्सवर लंडन सेंट्रल पार्कप्रमाणे उभारणार मुंबई सेंट्रल पार्क

महापालिका आयुक्तांनी सांगितला प्लॅन

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्स (Mahalakshmi race course) ही मुंबईतील (Mumbai) प्रचंड मोठी आणि मोकळी जागा आहे. मात्र, ही जागा नेमकी कशासाठी वापरली जाणार हा मुद्दा २०१३ पासून चर्चेत आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी रेसकोर्सची जागा बिल्डरला देण्यात येणार असल्याचा आरोप सरकारवर केला आहे. यावर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी स्पष्टता दिली आहे. ही जागा केवळ गार्डनसाठीच वापरण्यात येणार असून या ठिकाणी लंडन सेंट्रल पार्कप्रमाणे (London central park) मुंबई सेंट्रल पार्क (Mumbai central park) उभारण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त चहल यांनी दिली. ही जागा कोणत्याही बिल्डरला देण्यात येणार नाही, असंही ते म्हणाले.

महालक्ष्मी रेसकोर्सचा मुद्दा हा २०१३ पासून आहे. माझी त्यांच्यासोबत चर्चा देखील सुरु आहे आणि १२ ते १३ बैठका देखील झाल्या आहेत, अशी माहिती यावेळी इक्बालसिंह चहल यांनी दिली. ते म्हणाले, मुंबईचा हा भाग जवळपास १ लाख एकरचा आहे. संजय गांधी पार्क सोडून आणि पब्लिक गार्डन पार्क सोडून एकूण १४० एकर ही जागा आहे. त्यामुळे असं ठरलंय की ९१ एकरमध्ये रेसकोर्स चालेल आणि बाकी जागा ही पार्कसाठी वापरली जाईल.

लंडन सेंट्रल पार्कसारख्या पार्कची उभारणी करणार

पालिका आयुक्तांनी म्हटलं की, ही जागा बिल्डरकडे देणार ही गोष्ट बकवास आहे. त्यामुळे महालक्ष्मीची जागा फक्त गार्डनसाठीच वापरली जाईल. लंडन सेंट्रल पार्कसारख्या पार्कची आमची योजना आहे. रेसकोर्सच्या सदस्यांसोबत बैठक देखील बोलावली होती. त्या बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलं की, इकडे गार्डन होणार म्हणून मी अॅफिडेव्हिट द्यायला तयार आहे.

दोन गार्डन जोडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. कोस्टल रोड आणि महालक्ष्मीचं गार्डन आम्ही सबवेने जोडू आणि मुंबई सेंट्रल पार्क उभारु. त्यासाठी लोकांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. ३०० एकर जागेवर आम्ही हे पार्क उभारणार आहोत. एमओयू आम्ही ड्राफ्ट करतोय, ज्यामध्ये सरकार, पालिका आणि रेसकोर्सच्या सदस्यांमध्ये हा एमओयू होणार. त्यानंतर कॅबिनेटकडून हा निर्णय घेतला जाईल. निर्णय घेतल्यानंतर ऑर्डर पास होईल आणि मग काम सुरु केले जाईल. त्यामुळे बिल्डर इथे येऊन बांधकाम करणार या गोष्टींना काही अर्थ नाही, असं पालिका आयुक्त म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -