Union Budget 2024 : सर्वाइकल कॅन्सरपासून बचावासाठी ९ ते १४ वर्षांच्या मुलींना मोफत लस देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज सलग सहाव्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर केला. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या विकासाबाबत भरपूर समावेश करण्यात आला आहे. सर्वाईकल कॅन्सर रोखण्यासाठी ९ ते १४ वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. मिशन 'इंद्रधनुष' अंतर्गत हे अभियान सुरू करण्यात येणार आहे.


आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांना देण्यात येईल. माता आणि बाल आरोग्य सेवेबद्दल, सीतारमण यांनी सांगितले की, माता आणि बाल आरोग्य सेवेसाठी विविध योजना राबवल्या जातील. अंगणवाड्यांचा दर्जा वाढविला जाईल.


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सर्वाइकल कॅन्सर टाळण्यासाठी Cervavac नावाची लस विकसित करेल, जी HPV च्या चार प्रकारांपासून संरक्षण प्रदान करते - 16, 18, 6 आणि 11. SII चे CEO आदर पूनावाला यांनी आधीच सांगितले होते की, या लसीची किंमत २००-४०० रुपये प्रति रुपये डोस असेल. सध्या बाजारात गर्भाशय ग्रीवाच्या लसी उपलब्ध आहेत. त्या लसींची किंमत प्रति डोस २,५०० ते ३,३०० रुपये आहे.


सिक्कीम सरकारने २०१६ मध्ये GAVI नावाची लस खरेदी केली आणि ही लस ९ ते १४ वर्ष वयोगटातील मुलींना देण्यात आली. आकडेवारी दर्शवते की, सिक्कीम सरकारच्या आकडेवारीनुसार, या कार्यक्रमांतर्गत ९७ टक्के मुलींचे लसीकरण करण्यात आले. आता ते नियमित लसीकरणाचा भाग म्हणून प्रदान करतात आणि कव्हरेज टक्केवारी सुमारे ८८ ते ९० टक्के आहे.


अर्थमंत्री म्हणाल्या की, देशात महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून त्यामुळे त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होत आहे. लखपती दीदी योजनेंतर्गत देशात १ कोटी लखपती दिदी बनल्या आहेत. त्यांचे उद्दिष्ट २ कोटींवरून ३ कोटी करण्यात आलं असून ३ कोटी लखपती दिदी तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना सर्वाईकल कॅन्सरची लस दिली जाईल, जेणेकरून हा कर्करोग टाळता येईल.

Comments
Add Comment

चिंता करू नका; भारतात गॅस-इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध - मंत्री हरदीप सिंह पुरी

लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पश्चिम आशियातील संकटानंतर देशात गॅस

तुम्हाला 'या' ५ प्रकारे गॅस सिलेंडर बुक करता येणार; कोणता सर्वात सोपा पर्याय?, जाणून घ्या.

नवी दिल्ली: देशातील लाखो कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या हत्येचा प्रयत्न

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच