T20 World Cup 2024: खुशखबर! टी-२० वर्ल्डकपसाठी तिकीटींची विक्री सुरू, येथे करू शकता बुकिंग

मुंबई: क्रिकेट चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. यावर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या यजमानपदामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४साठी तिकीटांची बुकिंग सुरू झाली आहे. ही तिकीटांची बुकिंग ७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे.


क्रिकेट चाहत्यांना वर्ल्डकपच्या सामन्यांची मजा घ्यायची असेल आणि तिकीट बुक करायचे असेल तर t20worldcup.com वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करू शकतात. वर्ल्डकप १ ते २९ जून दरम्यान खेळवला जाणार आहे.


आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलच्या माहितीनुसार यावेळेस तिकीटांची विक्री फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या आधारावर असणार नाही तर ७ दिवसांत तिकीट खरेदी करण्यासाठी सर्वांना समान संधी दिली जाईल.


आयसीसीने स्पष्ट केले की एक व्यक्ती म्हणजेच आयडीएवर एका सामन्यांचे जास्तीत जास्त ६ तिकीट मिळू शकतात. या पद्धतीने कितीही सामन्यांचे तिकीट बुक करू शकतात. तिकीटांची किंमत कमीत कमी ६ डॉलर(५०० रूपयांपासून ) सुरू आहे.



२.६० लाखाहून अधिक तिकीट


ग्रुप स्टेज, सुपर ८ आणि सेमीफायनलपर्यंतच्या सामन्यांसाठी २.६० लाखाहून अधिक तिकीट जारी करण्यात आले आहे. प्रत्येक तिकीटाची किंमत त्याच्या कॅटेगरीच्या हिशेबाने वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. यावेळेस टी-२० वर्ल्डकप १ ते २९ जूनदरम्यान असणार आहे. या अंतर्गत फायनलसह एकूण ५५ सामने खेळवले जातील. हे सर्व सामने ९ शहरांमध्ये असणार आहेत.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना