बिहारमध्ये भाजपसोबत सरकार बनवणार नितीश कुमार - सूत्र

पाटणा - बिहारमध्ये(bihar) राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. पुढील २४ तास बिहारच्या राजकारणातील महत्त्वाचे आहेत. नितीश कुमार राजीनामा देऊ शकतात. ते भाजपसोबत जात आपले सरकार बनवू शकतात. २८ जानेवारीला नितीश यांचा शपथग्रहण विधी होऊ शकतो. उपमुख्यमंत्री भाजपचे सुशील मोदी बनू शकतात.


सूत्रांच्या माहितीनुसार जदयू-भाजपसोबत आल्याने नीतीश कुमार मुख्यमंत्री बनत आहेत. तर उपमुख्यमंत्री भाजपचे सुशील मोदी असतील. असेही म्हटले जात आहे की भाजपकडून दोन उपमुख्यमंत्री बनू शकतात. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र करण्याच्या शक्यतेवर बिहारच्या भाजप नेत्यांनी समर्थनार्थ आपले मत मांडलेले नाही. सूत्रांच्या मते लोकसभेसोबतच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार नाही.


बिहारच्या राजकारणात झालेली हालचातल आणि नितीश कुमार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांमुळे सध्या पक्ष सार्वजनिकरूपाने आपले पत्ते खोलण्यास तयार नाही. पाटणामध्ये झालेल्या राजकीय घमासानदरम्यान भाजपा अलकमानने बिहार भाजपच्या नेत्यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी बिहार भाजप नेत्यांसोबत पावणे दोन तास विचारमंथन केले.

Comments
Add Comment

Carbide Gun Causes : खेळणं की 'घातक शस्त्र'? दिवाळीचा आनंद अंधारात! १५० रुपयांच्या कार्बाइड गनने १४ चिमुकल्यांची दृष्टी हिरावली

जबलपूर : यावर्षी अनेक घरांसाठी दिवाळीचा सण आनंद नव्हे, तर दुःख आणि मोठी चिंता घेऊन आला आहे. याचे कारण म्हणजे

बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर भीषण बस अपघात, २० जणांचा मृत्यू; जयंत कुशवाहाचा थरकाप उडवणारा अनुभव

हैदराबाद : बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडला. प्रवाशांनी भरलेल्या बसने

देशभरात ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगवर बंदी येणार ?

नवी दिल्ली: देशात वाढत्या ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

दुचाकीच्या धडकेत बसला भीषण आग! २० जणांचा मृत्यू, चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले दु:ख

आंध्र प्रदेशः हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटे आगीबाबत एक मोठी

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय