Thackeray Group : चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची हत्या

मित्राच्याच कार्यालयाजवळ सापडला मृतदेह


चंद्रपूर : चंद्रपुरातून (Chandrapur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या (Thackeray Group) चंद्रपुरातील युवासेना (Yuvasena) शहर प्रमुखाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याचा मृतदेह एका मित्राच्या कार्यालयाजवळ आढळून आला आहे, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिवा वझकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचं वय ३० वर्षे होतं. प्रजासत्ताक दिनाच्या (Republic day) पूर्वसंध्येला घडलेल्या या घचटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.


प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस विभाग सतर्क असतानाच ही घटना घडली. त्यामुळे या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील बंदोबस्त वाढवला. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तसेच शिवा वझकर यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं.


मित्रासोबत झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवा वझकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि वाहनांची तोडफोड केली. दरम्यान या हत्येचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलं नाही. त्यामुळे पोलीस सध्या या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी