Nashik ATS : नाशिकमध्ये दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी एकाला अटक!

एटीएसची मोठी कारवाई


नाशिक : गेल्या काही दिवसांत ड्रग्ज प्रकरणामुळे (Drugs Cases) नाशिक (Nashik News) चर्चेत आलं आहे. नाशिकमधून अनेकदा अवैध कारभार होत असल्याचं समोर आलं आहे. त्यातच आता नाशिकमध्ये दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेला (Terrosrist organization) निधी पुरवल्याप्रकरणी एटीएसने एकाला अटक केली आहे. हुजेफ अब्दुल अजीज शेख असं या आरोपीचं नाव आहे. कोर्टाने आरोपीला ३१ जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.


नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरात आरोपीच्या घरी एटीएसने झाडाझडती केली. यात ७ मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि पेन ड्राइव्ह हस्तगत करण्यात आला. संशयित हुजेब शेख सीरिया मधील राबिया उर्फ उम ओसामा या आयसिसशी संबंधित महिलेला पैसे पाठवत असल्याची एटीएसची माहिती आहे. आयसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना फंडींग आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.


आरोपी हा उच्च शिक्षित आणि अनेक खासगी कंपन्यांमध्ये भागीदार असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. आता एटीएसने शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक, बिहार, तेलंगणामध्ये आपली पथकं रवाना केली आहेत.

आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर विशेष न्यायालयाकडून आरोपी शेखला ३१ जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे