Prabhu Shri Ram : अवघी काही मिनिटे शिल्लक; कसा पार पडणार प्राणप्रतिष्ठा सोहळा?

जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक


अयोध्या : नववर्षातील आज सर्वात मोठा दिवस आहे. अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिरात आज बाळ प्रभु रामांची मूर्ती विराजमान होणार आहे. सर्व हिंदू देशवासी या क्षणासाठी आतुरले आहेत. अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. त्यानंतर आज १२ वाजून २९ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) होणार आहे.


ज्या मंदिरात हा महामंगल सोहळा संपन्न होणार आहे, त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोपऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झालं आहे. देशभरातही सगळीकडे दिव्यांचा लखलखाट करण्यात आला आहे.


आज राम मंदिराच्या गर्भगृहात दुपारी १२:१५ ते १२:४५ या वेळेत प्रभू श्रीरामाचा अभिषेक होणार आहे. राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचा शुभ मुहूर्त ८४ सेकंदांचा आहे, जो १२:२९ मिनिटे ८ सेकंदापासून सुरू होईल आणि १२:३० मिनिटे ३२ सेकंदांपर्यंत असेल.


२३ जानेवारीपासून भाविकांसाठी मंदिर दर्शनाची वेळ सकाळी ७ ते ११.३० आणि नंतर दुपारी २ ते ७ अशी असेल. राम मंदिरात सकाळी साडेसहा वाजता सकाळची आरती होईल, ज्याला शृंगार किंवा जागरण आरती म्हणतात. यानंतर दुपारी भोग आरती आणि सायंकाळी साडेसात वाजता संध्या आरती होईल. आरतीला उपस्थित राहण्यासाठी पास आवश्यक असेल.



आज प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा कसा पार पडणार?


सर्वात आधी नित्यपूजा, हवन पारायण, नंतर देवप्रबोधन, त्यानंतर प्रतिष्ठा पूर्वाकृती, नंतर देवप्राण प्रतिष्ठा, महापूजा, आरती, प्रसादोत्सर्गा, उत्तरांगकर्म, पूर्णाहुती, आचार्यांचं गोदान, कर्मेश्वरपण, ब्राह्मण भोजन, प्रशात्का, ब्राह्मण पुण्य, दान, दान, पूजन असे कार्यक्रम होतील. इत्यादी संकल्प, आशीर्वाद आणि मग कर्म पूर्ण होईल.



१० वाजल्यापासून मंगल ध्वनीचा भव्य कार्यक्रम


श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने अयोध्येतील श्री रामजन्मभूमी येथे भक्तीभावाने संपन्न होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सकाळी १० वाजल्यापासून 'मंगल ध्वनीं'चं भव्य वादन होणार आहे. विविध राज्यातील ५० हून अधिक मनमोहक वाद्यं सुमारे २ तास या शुभ सोहळ्याचे साक्षीदार असतील. अयोध्येतील यतींद्र मिश्रा हे या भव्य मंगल वादनाचे शिल्पकार आणि आयोजक आहेत, ज्यामध्ये केंद्रीय संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली यांनी सहकार्य केले आहे. ट्रस्टने म्हटलं आहे की, भगवान श्री राम यांच्या सन्मानार्थ विविध परंपरा एकत्र करून हा भव्य सोहळा प्रत्येक भारतीयासाठी एक महत्त्वाचा प्रसंग आहे.

Comments
Add Comment

बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७