मुंबई : राज्यात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ‘निरोगी तरूणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानाद्वारे १८ वर्षांवरील युवकांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीद्वारे आतापर्यंत राज्यात अडीच कोटी पुरूषांची तपासणी करण्यात आली असून त्याद्वारे ३६ लाख पुरूषांना उच्च रक्तदाब, (blood pressure) ४ लाख जणांना मधुमेह (diabetes) आढळून आला आहे. यामुळे, राज्य उच्च रक्तदाबाची राजधानी होऊ पाहतेय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ‘निरोगी तरूणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ हे अभियान राज्याच्या आरोग्य विभागाने सुरू केले असून ते यावर्षी मार्च महिन्याअखेर सूरू राहणार आहे. या अभियानाद्वारे राज्यातील १८ वर्षावरील ४ कोटी ६७ लाख पुरूषांची तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना आरोग्य खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, राज्यात अडीच कोटी पुरूषांची तपासणी झाली असून त्यापैकी ३२.६६ लाख जणांना वेगवेगळया आजारांसाठी वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. तर २७ हजार ९७४ जण छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे गेले.
या अभियानाद्वारे अठरा वर्षावरील प्रत्येक पुरूषाची असंसर्गजन्य आजारांबाबत तपासणी करण्याचे ध्येय आहे. यामध्ये रक्तदाब, बीएमआय, लठ्ठपणासोबत गरज पडल्यास चाचण्या जसे इसीजी, सीटीस्कॅन, एक्सरे आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच ज्यांना शस्त्रक्रियांची गरज पडेल त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार देण्यात येणार आहेत.
आरोग्यवर्धिनी केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व सामुदायिक आरोग्य केंद्र, हिंदुह्रदयसम्राट आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय अशा विविध स्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये ही तपासणी केली जात आहे.
या अभियानाअंतर्गत पुणे विभागात ९ लाख जणांना रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. तसेच, ७५ हजार ५०० जणांना मधुमेहाचे निदान करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…