मुंबई: ओला नारळ आपल्या गुणांमुळे आरोग्यासाठी अतिशय वरदान असतो. तुम्ही कोणत्याही मोसमात ओल्या नारळाचे सेवन केल्यास याचे अनेक फायदे मिळतात. खासकरून थंडीच्या दिवसांत ओला नारळ शरीराला भरपूर पोषण देतात. कारण या हंगामात शरीराला अधिक एनर्जीची गरज असते. ओल्या नारळामध्ये भरपूर फायबर आणि आर्यन असतात यासोबतच कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात जे शरीराच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. जर तुम्ही याचे दररोज सेवन केले तर शरीर मजबूत होते आणि एनर्जी भरपूर राहते.
ओल्या नारळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. हे खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत. ओल्या नारळामध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, पोटात जळजळ या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे पाचनशक्ती सुधारते.
वजन कमी करण्यामध्ये ओला नारळ अतिशय मदतगार ठरतो. ओल्या नारळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते हे खाल्ल्याने बराच काळ भूक लागत नाही. ओल्या नारळामध्ये ट्रायग्लिसराईड असते जे शरीरातील फॅट बर्न कऱण्यास मदत होते. ओल्या नारळाच्या सेवनाने शरीरात कोलेस्ट्रॉलचा स्तर योग्य प्रमाणात राहतो.
ओल्या नारळामुळे केवळ शरीरच नाही मेंदूच्या विकासातही फायदा होतो. यात आर्यन आणि व्हिटामिन बी ६ आढळते. यामुळे मेंदूचा विकास होतो. हे खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो.
ओल्या नारळामध्ये व्हिटामिन सोबत खूप सारे अँटी ऑक्सिडंट असतात जे स्किनसोबतच केसांनाही पोषण मिळते. यात आढळणारे व्हिटामिन ई त्वचेला सुंदर, स्वस्थ आणि चमकदार बनवतात. यासोबतच यांच्या सेवनाने केसांचा रुक्षपणा आणि तुटण्याची समस्याही कमी होते.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…