Chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव ट्रकने उडवल्या ३ कार, ७ दुचाकी आणि १ रिक्षा!

  79

भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू तर सहाजण जखमी


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati sambhaji nagar) काल संध्याकाळच्या सुमारास एक भीषण आणि विचित्र अपघाताची घटना (Accident News) घडली. पैठण रोडवर नक्षत्रवाडीजवळ एका भरधाव ट्रकने ३ कार, ७ दुचाकी आणि १ रिक्षा उडवली. अपघातामधील मृतांबद्दल अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.


धुळे सोलापूर हायवेवरून पैठण रोडवर ट्रक उतरत होता. हा रस्ता अरुंद होता. त्यात रात्रीचेही काम चालू होते. त्यामुळे सोलापूरकडून धुळ्याकडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचवेळी ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा विचित्र अपघात झाला. उतारावरून खाली उतरत असताना भरधाव ट्रक थांबलेल्या वाहनांना उडवत गेला. संध्याकाळी सात वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. या भीषण अपघातामध्ये जवळपास १० ते १५ पेक्षा अधिक वाहनचालक जखमी झाले, त्यापैकी सहाजण गंभीर अवस्थेत आहेत. त्यांच्यावर जवळील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


या अपघातामुळे रस्त्यावर वाहने, काचांचा ढिग साचला होता. अपघात झाल्यानंतर स्थानिकांची प्रचंड गर्दी झाली. शेकडो लोक घटनास्थळी दाखल झाले होते. सर्व वाहने एकमेकांमध्ये अडकलेली असल्याने त्यांना काढण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातामध्ये १ महिला जागीच ठार झाली तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


Comments
Add Comment

बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक, विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते भिडले

बीड : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणी पुणे : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना मंडई, शनिपार, तुळशीबाग

गणेशोत्सवासाठी प्लास्टिक फुलांची दुकाने सजली...!

फुलशेती कोमेजली, शासनाने प्लास्टिक फूल, हार विक्रीवर बंदी घालावी श्रीरामपूर : एकीकडे प्लास्टिक बंदीचा जागर सुरू

ST Employees Salary: बाप्पा पावले! एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळणार

मुंबई: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा

अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईसाठी निघणार, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर

Atharv Sudame controversy: गणेशोत्सवापूर्वी व्हायरल झालेल्या 'त्या' रीलमुळे पुण्याचा कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे अडचणीत! मागितली माफी

पुणे: लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अथर्व सुदामेच्या पुणेरी रील्सचे अनेक चाहते आहेत. सुदामेने त्याच्या