Weight Loss: वेट लॉससाठी नाश्त्यात असे खा मखाणे, फूड क्रेविंगपासूनही मिळेल सुटका

मुंबई: आजकाल अनेक लोक लठ्ठपणामुळे(obesity) त्रस्त आहेत. अधिक वजन खाण्याच्या पिण्याच्या सवयी आणि खराब लाईफस्टाईलमुळे वाढते. अशातच कॅलरीकडे लक्ष देणे गरजेचे असते. डाएटिंगचा अर्थ केवळ उपाशी राहणे असा नसतो. मात्र त्याऐवजी असे पदार्थ खाल्ले जे हेल्दी असतील. वजन घटवण्यासाठी नाश्त्यामध्ये मखाणा खाणे हा एक चांगला पर्याय आहे. मखाणामध्ये कमी कॅलरीज आणि फायबरचे चांगले प्रमाण असते. यामुळे पोट भरलेले राहते आणि भूकही कमी लागते. सोबतच बेली फॅट कमी करण्यासही मदत होते.



फूड क्रेविंग होते कंट्रोल


मखाणामध्ये असे पोषक तत्व असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. मखाणामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. प्रोटीन पाचन क्रिया धीमी करते आणि दीर्घकाळापर्यंत पोट भरलेले राहते. यामुळे भोजनमधील कालावधी वाढतो. मखाणामध्ये कमी कॅलरीज आणि फॅट असते. यामुळे वजन वाढण्यापासून बचाव होते.



अशा पद्धतीने खा मखाणा


साधे मखाणा- मखाणा चांगला भाजून मीठ आणि काळी मिरी घालून खाऊ शकता.


फ्रुट मखाणा - मखाणामध्ये केळे, सफरचंद, डाळिंब इत्यादी फळे टाकून. तुम्ही हे मिश्रण दुधासोबत खाऊ शकता.


मसालेदार मखाणा - मखाणा तेलावर परतून सैंधव मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि धणे पावडर टाकून स्वादिष्ट बनवू शकता.


चाट मखाणा - मखाणा चाट बनवून नाश्त्यात खाऊ शकता. यात टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची टाका.


मखाणा पराठा - बेसन मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात मखाणा आणि मसाले मिसळून पराठा बनवू शकता.


मखाण्यामध्ये अँटी ऑक्सिडंट गुण असतात. यामुळे हळू हळू पचण्यास मदत होते. यामुळे मेटाबॉलिज्म रेग्युलेट होण्यास मदत होते. यामुळे वजन नियंत्रणात राहते. यामुळे दररोज नाश्त्यामध्ये मखाणा खाल्ल्याने वजन कमी होते. पोटही संतुष्ट राहते.

Comments
Add Comment

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे

कॉर्टिसोल म्हणजे काय? 'तणावाच्या संप्रेरका' बाबतच्या सोशल मीडियावरील दाव्यांमध्ये किती तथ्य? डॉक्टरांचा सल्ला

सध्या इंटरनेटवर 'कॉर्टिसोल' (Cortisol) या हार्मोनची मोठी चर्चा आहे. वेलनेस इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियावर पहाटे ३ वाजता

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून