Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात! बापलेकासह पाच जणांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांत राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) अशीच एक धक्कादायक अपघाताची बातमी समोर आली असून या भीषण अपघातात (Terrible Accident) बापलेकासह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.


बीड-नगर मार्गावरील लिंबागणेश गावापासून काही अंतरावरील ससेवाडी शिवारात काल शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. ट्रक व चारचाकी वाहनामध्ये झालेल्या जोरदार धडकीमुळे वडील-मुलासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात प्रल्हाद सिताराम घरत (वय ६३), नितिन प्रल्हाद घरत (४१, दोघेही रा. महाजनवाडी ता. जि. बीड) या पिता-पुत्रासह विनोद लक्ष्मण सानप (४० रा. वाघिरा ता. पाटोदा) अशा तिघांसह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत अन्य दोघांची रात्री ११ पर्यंत ओळख पटली नव्हती. शवविच्छेदनासाठी मृतदेह बीडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.


ओळख न पटलेले ट्रकमधील असल्याचे समजते. अपघात एवढा भीषण होता की सर्व मृतांना बाहेर काढण्यासाठी एकमेकांमध्ये अडकलेल्या वाहनांचा पत्रा कापण्यासाठी यंत्र मागवावे लागले होते. घटनास्थळावर एक क्रेनही आणण्यात आला होता. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून नेकनूर पोलीस व स्थानिक नागरिकांचे वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतकार्य सुरू होते.

Comments
Add Comment

जळगाव : सोन्याचा भाव दीड लाखांच्या उंबरठ्यावर

गेल्या 24 तासांत सोन्याचे दर 3,500 रुपये वाढले चांदीच्या भावातही 3,000 रुपयांची झाली वाढ जळगाव : सोन्या-चांदीच्या

केळीच्या दरात मोठी घसरण, शेतकरी वर्ग हवालदिल

जळगाव : केळी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यासह परिसरात यंदाच्या हंगामाची

पुणे - वाहन क्रमांक आरक्षणासाठी २ एप्रिलपासून फेसलेस सेवा सुरू

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची

Akola Crime : अकोल्यात वर्दीला काळिमा फासणारी घटना; कोठडीतल्या महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

अकोला : 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्राच्या पोलिसांचे ब्रीदवाक्य, ज्याचा आदर संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

कुंभमेळ्याच्या रिंग रोडला असलेला अडथळा अखेर संपला

उपजिल्हाधिकारी वाघांच्या मदतीला यश नाशिक : मागील काही दिवसांपासून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रिंग रोड साठी अडकून

सोलापूर : घराच्या आवारात गांजाची लागवड; गुन्हे शाखेची धडक कारवाई, २१ किलो गांजासह आरोपी जेरबंद

सोलापूर : सोलापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सहसा ग्रामीण भागात किंवा दुर्गम