Eknath Shinde : हेलिकॉप्टरमधून फोटो काढण्यापेक्षा शेती केलेली केव्हाही चांगले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला


हिंगोली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पूर्ण केले. राम मंदिरासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रित केले. परंतु त्यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला, अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने आघाडी केली, असेही नमूद करत सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर यांना पोटशुळ का? पोटदुखी का? हेलिकॉप्टरमधून फोटो काढण्यापेक्षा हेलिकॉप्टरने शेती केलेली केव्हाही चांगली आहे. आम्ही फेसबुक लाईव्हने नाही तर लोकांकडे जाऊन त्यांचे काम करत आहोत. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसैनिकांना ताटकळत ठेवले. आज वर्षा बंगला सर्वांसाठी खुला आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.


हिंगोलीतील (Hingoli) शिवसंकल्प अभियान सभा बुधवारी (दि.१०) पार पडली. यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला देखील न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहोत. काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला बळी पडायचे नाही. लोकांच्या सुख-दु:खात धावून जाणारा मुख्यमंत्री आहे. मला काय मिळेल यापेक्षा राज्याला काय मिळेल, याचा मी जास्त विचार केला. धनुष्यबाण आपल्या सोबत आहे. बाळासाहेबांचा विचार आपल्या सोबत आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.


उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना ताठकळत ठेवले. आज वर्षा बंगला सर्वांसाठी खुला आहे. या राज्यात सध्या विकासाला चालना मिळत आहे. गेल्या अडीच वर्षांपूर्वी राज्याला मागे नेण्याचे काम सुरु होते. हा एकनाथ शिंदे आयुष्यातील प्रत्येक क्षण महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च करणार आहे. मी घरात बसून उंटावरुन शेळ्या राखणारा नेता नाही, अशी टीकाही शिंदेंनी ठाकरेंविरोधात केली.

मी सामान्य कार्यकर्ता म्हणून आज काम करत आहे. माझ्या राज्यातील नागरिकांवरचे संकट मला दूर करायचे आहे. मला फक्त प्रेम कमवायचंय. हेलीकॉप्टरने शेती करतो म्हणून टीका केली जाते. हेलीकॉप्टरने जाऊन शेती करणे चांगलेच आहे. माझी नाळ शेतीशी जुळलेली आहे. मी नेहमी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आपली भूमिका बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांची भूमिका आहे. आपला सर्वांचा संकल्प म्हणजे राज्याचा सर्वांगीण विकास हाच आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही सर्व नियम बाजूला ठेवतो. आम्ही आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार देतोय. माताभगिनींसाठी एसटीचे तिकीट निम्मे केले. ज्येष्ठांना देखील मोफत प्रवास सुरु केला, असेही शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

Dry day : महाराष्ट्रात उद्या ड्राय डे! आषाढी एकादशीमुळे सर्व दारूची दुकाने, वाईन्स शॉप्स राहणार बंद

मुंबई: उद्या शनिवार 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीनिमित्त मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे (Dry Day) पाळला जात आहे.

Beed Suicide News : बीडमध्ये धक्कादायक घटना; आईची 4 वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी

बीड (Beed) जिल्ह्यातील शिदोड गावातून एक काळीज पिवटाळून टाकणारी घटना समोर आली आहे. 25 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या 4

Ashadhi Wari : वारकऱ्यांसोबत रांगेत उभे राहून भरत गोगावले यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन; आनंदवारी उपक्रमालाही दिली भेट

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा'; मंत्री भरतशेठ गोगावले यांची आनंदवारीत सेवाभावी चरणसेवा पंढरपूर  : आषाढी

Sachin Ahir : सचिन अहिर यांच्या मुंबईतील घरात मोठी चोरी; 2.65 कोटींचा ऐवज लंपास, घरातील कर्मचाऱ्यावर संशय

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास होणार हायटेक! लाईन ३ वर स्मार्ट तिकीट व्यवस्था सुरू

पुणे : पुणे मेट्रो (Pune Metro) लाईन ३ (Line 3) वर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक

Pune Wethear : पुण्यात पावसाचा जोर कायम; शहराला ऑरेंज, घाटमाथ्याला रेड अलर्ट

पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून पुढील दोन दिवसही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची