Sachin Ahir : सचिन अहिर यांच्या मुंबईतील घरात मोठी चोरी; 2.65 कोटींचा ऐवज लंपास, घरातील कर्मचाऱ्यावर संशय


















शिवसेना (शिंदे गट)चे नेते, माजी मंत्री आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या मुंबईतील निवासस्थानी मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या घरातून सुमारे 2.65 कोटी रुपये किमतीचा मौल्यवान ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी एकाच वेळी झालेली नसून टप्प्याटप्प्याने करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घरातील मौल्यवान वस्तू कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन अहिर यांनी याची पडताळणी केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दागिने, सोन्याची बिस्किटे आणि इतर मौल्यवान वस्तू गायब असल्याचे उघड झाले. (Mumbai Crime)


चोरी झालेल्या ऐवजात सोन्याची बिस्किटे, हिऱ्यांचे दागिने, चांदीची भांडी आणि काही रोख रकमेचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण चोरी झालेल्या मालाची किंमत सुमारे 2.65 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (Theft Case)


या प्रकरणात घरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. घरातील मौल्यवान वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत, घरातील हालचाली आणि ये-जा याची माहिती असलेल्या व्यक्तीनेच ही चोरी केल्याची शक्यता तपास यंत्रणा पडताळून पाहत आहे. (Maharashatra News)



प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींची चौकशी, पुरावे संकलित करणे आणि चोरीला गेलेल्या ऐवजाचा माग काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


एका वरिष्ठ राजकीय नेत्याच्या घरात इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने राजकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नसल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.










Comments
Add Comment

Dhule : जंगलात आढळले तरुण-तरुणीचे मृतदेह, धुळ्यात नेमकं काय घडलं ?

Dhule : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम

Anna Bansode : अनधिकृत बांधकामाबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (KUADA) कार्यक्षेत्रातील विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर

Sukhbir Singh Badal Attack : धक्कादायक! नांदेडमध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; सुरक्षा कर्मचारीही जखमी

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे  (Shiromani Akali Dal) राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यू; महिन्याभरात पत्नीसोबत घडला असा प्रकार...

पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत (Pune Moshi) पतीचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरात 23 वर्षीय पत्नीने गळफास

Crime News : धुळे जिल्हा परिषदेचा फिटर खासगी एजंटसह जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Crime News : जळगाव एसीबीकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्यासह

Nagpur Accident News : नागपुरात भीषण अपघात; ट्रकची कारला धडक, 11वीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

नागपूर : नागपूरच्या कलमाना परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 11वीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा